महाराष्ट्र

टीव्ही सेंटर येथील महापालिका गाळ्यांसाठीच्या अटी-शर्ती बदलणार

आता ई-निविदा पद्धतीद्वारे होणार गाळ्यांचा लिलाव…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील टी.व्ही. सेंटर येथील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिकेने ई-ऑक्शनद्वारे इच्छुकांकडून दर मागविण्यात आले असून या गाळ्यांसाठी विविध आरक्षणेही आहेत. आरक्षणातील एखाद्या दिव्यांग व्यक्तीने २५ लाख किंवा त्यापेक्षा मोठी रक्कम आणायची कोठून? त्यासाठी ई-टेंडर करा, इच्छुकाला जॉइंट व्हेंचर करत व्यवसाय करण्याची संधी द्या, अशी सूचना मनपा प्रशासकांनी केली.

छत्रपती संभाजीनगर शहरातील मनपाच्या मालमत्ता विभागाने टीव्ही सेंटर येथील व्यापारी संकुलातील १० गाळ्यांच्या लिलावासाठी ई-ऑक्शन पद्धत अवलंबण्यात आली होती. या प्रक्रियेवर नागरिकांनी आक्षेप घेतल्यामुळे ई-निविदा पद्धतीद्वारे गाळ्यांचा लिलाव होणार आहे. लिलावात दिव्यांग, गरिबांसाठीही आरक्षण आहे. काही दिव्यांग व गरिबांकडे गाळ्यांच्या लीजसाठी लागणारी २५ ते ३० लाखांची रक्कम नसते. ते इच्छा असली तरी एवढे पैसे कुठून आणणार? त्यामुळे आता दिव्यांग व गरिबांसाठी गाळे घेण्यासाठी जाॅइंट व्हेन्चरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशा व्यक्ती आपला पार्टनर सोबत घेऊन गाळे घेऊ शकतात, असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.

यापुढे शहरात टपऱ्यांना परवानगी नाही

संभाजीनरात जागोजागी रस्त्याच्या कडेला टपरी, हातगाडी लावण्यासाठी पालिकेकडे परवानगी प्रस्ताव दाखल केले जातात. मात्र, आता यापुढे एकालाही अशी परवानगी दिली जाणार नाही. विनापरवानगी टपऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारादेखील प्रशासकांनी दिला. पार्किंग पॉलिसी, पथविक्रेता धोरणही लवकरच राबवले जाईल, असे त्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

16 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

16 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

16 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago