महाराष्ट्र

मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण क्षमतेने व ताकदीने उमेदवार उतरवणार; सुनिल तटकरे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसची जी तिसरी यादी जाहीर होईल त्यामध्ये सर्व उमेदवार पूर्ण ताकदीचे व क्षमतेचे असतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना व्यक्त केला.

सोलापूर, रायगड जिल्ह्यातील पनवेल, कोल्हापूर, नाशिक या सर्व ठिकाणी महायुती म्हणून निवडणूका लढल्या जात आहेत. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती आहे तर काही ठिकाणी तिन्ही पक्षांची युती आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे याची जाणीव महायुतीच्या वरीष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळे दिर्घकाळानंतर झालेल्या निवडणुका असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठया प्रमाणावर आहेत. ज्यावेळी युती करत असतो त्यावेळी जागा वाटप करताना मित्र पक्षांना जागा सोडाव्या लागतात त्यामुळेच युती न होण्याची शक्यता व्यक्त करतानाच महायुतीला महाराष्ट्रात प्रचंड यश मिळेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

मुंबई हे बहुभाषिक, बहुधर्मीय शहर आहे. मात्र महानगरपालिकेसाठी राजकीय पक्षांची यादी बघितली तर त्यामध्ये सर्व धर्माचे उमेदवार आहेत. मुंबईत ख्रिश्चन,आंबेडकरी चळवळीवर श्रध्दा असणारा मोठा वर्ग आहे. काही जागा राखीव असतात. मुंबईत हिंदी भाषिक, उत्तर भारतीय आहेत. अशावेळी त्यांची उमेदवार म्हणून निवड करणे अयोग्य आहे असे म्हणणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मुलभूत विचारांबद्दल शंका घेण्यासारखं होईल असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असलेला एक विभाग आहे. त्यातून विधीमंडळ प्रतिनिधीत्व केले जाते. त्यामुळे साहजिकच आहे त्याठिकाणी जागा जाणार आहेत आणि त्यात सहा ते सात नगरसेवक असतात. त्यामुळे विशिष्ट समाजाला प्रतिनिधीत्व दिले हा माझ्या पक्षावर आरोप होत असेल तर तो अनाठायी आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

5 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

5 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

5 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

6 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

6 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

11 तास ago