महाराष्ट्र

रायगडमधील उबाठा गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांनी हाती बांधले घड्याळ

रायगडमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का…

मुंबई: शिवसेना उबाठा गटाचे रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, उपतालुकाप्रमुख गणपत म्हात्रे, नागोठणे विभागप्रमुख संजय भोसले आदींसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

महिला विकास मंडळ सभागृह मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला महिला बालविकासमंत्री अदितीताई तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष मधुकर पाटील, पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते राजीव साबळे उपस्थित होते.

किशोर जैन यांच्यासमवेत माजी सरपंच मिलिंद धात्रक, माजी सरपंच संतोष नागोठणेकर, मोहन नागोठणेकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल महाडीक, कळसुरेचे माजी सरपंच भालचंद्र शिर्के, ग्रामपंचायत सदस्य अजगर मुल्ला, सचिन ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य ॲड. प्रकाश कांबळी, शाखाप्रमुख धनंजय जगताप, असलम शेख, संजय काकडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

16 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago