महाराष्ट्र

बूस्टर लसीकरणाची गती वाढवावी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’ अंतर्गत लसीकरणाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला असून राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीचा दुसरा तसेच बूस्टर डोस देण्यासाठी नियोजन करुन लसीकरणाची गती वाढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिल्या.

यावेळी विधिमंडळातील समिती कक्षात सुभाष पाटील आणि अशका पवार यांना लस देण्यात आली. परिचारिका लता कोहाड यांनी त्यांना लस दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, अपर मुख्य सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालक दीपक कपूर, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी एन. आरोग्य संचालक डॉ साधना तायडे आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. हेमंत बोरसे, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार, सहाय्यक संचालक डॉ संजीव जाधव, डॉ. विलास साळवी यांनी संयोजन केले.

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सवाअंतर्गत सर्व शासकीय केंद्रांवर १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाणार आहे. मात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा घेऊन ६ महिने अथवा २६ आठवड्यांचा कालावधी पूर्ण केलेला असावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

8 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

17 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago