शिरुर: भाजपचे ज्येष्ठ नेते शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यावर शोकाकुल वातावरणात सायंकाळी तर्डोबाची वाडी (ता.शिरूर) येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिरुरचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे गुरुवार (दि.११) रोजी सकाळी निधन झाले होते.त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांचे बाबूराव नगर येथील निवासस्थानी नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.यावेळी अनेक नागरिकांनी दर्शन घेतले. त्यानंतर शिरुर शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. निर्माण प्लाझा ते बाजारसमिती येथे पार्थिव नेण्यात आले. एस टी बस स्थानक पुणे नगर रस्त्यावरून बी. जे.कॉर्नर ते तर्डोबची वाडी अशी अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते.सायंकाळी उशिरा शिवतारा पर्यटन केंद्रात अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी त्यांचे चिरंजीव राहुल यांनी मुखाग्नी दिला.
या अंत्यविधीला माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, दौंड चे आमदार राहुल कुल, शिरुर चे माजी आमदार पोपटराव गावडे, आमदार निलेश लंके, माजी आमदार विजय औटी, माजी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माऊली कटके, जालिंदर कामठे, माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरिअन, माजी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, शिवसेना नेत्या जयश्री पलांडे, माजी बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, शिरुर आंबेगाव राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, भाजपचे ज्येष्ठ नेते दादा पाटील फराटे, भाजपचे तालुकाध्यक्ष आबा सोनवणे, माजी तालुकाध्यक्ष भगवान शेळके आदी सह शिरुर हवेलीतील हजारो नागरिक उपस्थित होते.
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…
१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…
लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…
नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…
चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…