शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांची हातात तिरंगा घेत प्रभातफेरी काढून प्रशालेत विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे रक्षाबंधन देखील मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत रक्षाबंधनाच्या निमित्ताने तसेच स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षानिमित्त सर्व विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गात, स्वातंत्र्याबाबत घोषणा दिल्या. त्यानंतर प्रशालेत रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थिनींनी त्यांच्या विद्यार्थी बंधूंना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला.
याप्रसंगी प्रशालेचे सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी आढाव यांनी प्रातिनिधिक स्वरुपात प्रशालेच्या उपशिक्षिका मनीषा ठुबे यांच्याकडून राखी बांधून प्रशालेतही रक्षाबंधनाचा सण साजरा केला. सदर उपक्रमाचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनिता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर, मानद सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी कौतुक केले.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…