महाराष्ट्र

राजकीय गणित बिघडलं! भाजपला जबरदस्त धक्का; शंभूराज देसाईंचा दबदबा कायम

सातारा: सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ जागांसाठी मतमोजणी सुरू असून पाटण तालुक्यातून एक धक्कादायक निकाल समोर आला आहे. पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटात भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील यांचा पराभव झाला आहे. या गटातून शिवसेनेच्या २२ वर्षीय मृणाल महेश पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

या विजयामुळे मृणाल महेश पाटील या सातारा जिल्ह्यातील सर्वात कमी वयाच्या जिल्हा परिषद सदस्य ठरल्या आहेत. प्राची पाटील यांचा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शंभूराज देसाईंनी पाटणमध्ये बालेकिल्ला राखला

पाटण तालुक्यात मंत्री शंभूराज देसाई यांनी आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळवलं आहे. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी पाटण तालुक्यात शंभूराज देसाई यांच्या विरोधात आक्रमक प्रचार केला होता. जिल्हा परिषद निवडणूक महायुती म्हणून लढावी, अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र, शंभूराज देसाईंनी बोलावलेल्या बैठकीकडे भाजपच्या प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र होतं.

तरीही, पाटण तालुका पंचायत समितीवर शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली असून जिल्हा परिषद गटांमध्येही त्यांना चांगलं यश मिळालं आहे.

साताऱ्यात राजकीय घराण्यांना धक्के

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांचे चुलत भाऊ अरुण गोरे (कुकुडवाड गट) पराभूत

औंध गटातून भारती गोरे यांचा पराभव

सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे (कुसुंबी गट) पराभूत

खेड गटातून भाजपचे संदीप शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे कामेश कांबळे यांनी पराभव केला

सातारा जिल्हा परिषद : पक्षीय बलाबल (२०२६)

एकूण जागा : ६५

भाजप : २३

राष्ट्रवादी काँग्रेस : २२

शिवसेना : १३

काँग्रेस : १

इतर : २

ठाकरे गट : ०

जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती

सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. भाजप २३ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्तास्थापनेसाठी पुढील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago