आरोग्य

कोणते गाजर चांगले लाल की नारंगी

हिवाळ्याच्या सुरुवातिपासून बाजारात लाल किंवा नारंगी गाजर दिसायला सुरूवात होते. गाजर फक्त चवीला उत्तम नसून तब्येतीच्या दृष्टीनंही चांगले असतात. पण अनेकदा कोणते गाजर खावेत, कोणते गाजर चांगले याबाबत लोक संभ्रमात असतात. दोन्ही प्रकारच्या गाजरांचे स्वत:चे वेगवेगळे गुणधर्म आणि पोषक तत्व असतात ज्यामुळे ती आहारात महत्वाची ठरतात.

लाल गाजर

चव आणि पोषकतेच्या दृष्टीनं पाहिल्यात लाल गाजरं प्रामुख्यानं भारत आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या गाजरांचा लाल रंग हा त्यातील लायकोपीन या घटकामुळे असतो. लायकोपीन हे एक शक्तीशाली एंटी ऑक्सिडेंट आहे जे हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. लाल गाजरं चवीला अधिक गोड आणि रसाळ असतात. त्यामुळेच ती हलवा, कोथिंबीर किंवा ज्यूस करण्यासाठी सर्वाधिक वापरली जातात.

नारंगी गाजरं

नारंगी गाजरं ही वर्षभर उपलब्ध असतात. या गाजरांमध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. जेव्हा आपण ही गाजरं खातो तेव्हा आपले शरीर बीटा कॅरोटीनचे रुपांतर व्हिटामीन ए मध्ये करते हे जीवनसत्त्व डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. नारंगी गाजरं चवीला थोडी कमी गोड असतात. पण ती सॅलेडमध्ये किंवा कच्ची खाण्यासाठी उत्तम मानली जातात.

आरोग्याच्या दृष्टीनं विचार केला तर दोन्ही गाजरं उत्कृष्ट ठरतात. जर तुम्हाला हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर लाल गाजरांना पसंती द्यावी. तर डोळ्याचे आरोग्य किंवा व्हिटॅमिन ए ची कमतरता भरून काढायची असेल तर नारंगी गाजरं खाणं फायदेशीर ठरतं.

निसर्गानं या दोन्ही भाज्यांमध्ये वेगवेगळी जीवनसत्वे भरलेली आहेत. त्यामुळे कोणत्याही एकाची निवड करण्यापेक्षा ऋतूप्रमाणे उपलब्ध असलेली दोन्ही प्रकारची गाजरं आहारात समाविष्ट करणं उत्तम ठरतं. थंडीच्या दिवसांत लाल गाजरांचा आनंद घ्या. इतर ऋतूंमध्ये नारंगी गाजरांचा वापर करून स्वत:ला निरोगी ठेवा. गाजराची कोशिंबीर, गाजराचा हलवा या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

9 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

10 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

10 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

10 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

10 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

10 तास ago