महाराष्ट्र

शेतकऱ्याच्या प्रसंगावधनामुळे फसला तरुणीवरील बलात्काराचा प्रसंग

पोलिसांच्या सतर्कतेने पिडीत तरुणी नातेवाईकांच्या स्वाधीन

पुणे: उरुळीकांचन येथील शेतकऱ्याने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे नराधमाच्या तावडीत सापडलेल्या एका परप्रांतीय तरुणीची सुटका झाली आहे. तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न फसला असून ही घटना उरुळी कांचन (ता. हवेली) रेल्वे स्थानक परिसरातील तांबे वस्ती परिसरात सोमवारी (दि. 4) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. धनंजय मारुती तांबे (रा. तांबेवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) असे शेतकऱ्याचे नाव असून तांबे यांच्या धाडसाचे परिसरात कौतुक केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय तांबे यांची उरुळी कांचन रेल्वे स्थानकाजवळ शेती आहे. या शेतीत ऊसाचे पिक आहे. सोमवारी सकाळी ऊसाच्या पिकाला तांबे हे पाणी देत होते. अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तांबे यांना 100 ते 150 फुटावर एक तरुणी ऊसाच्या शेतात ओरडत असल्याचा आवाज आला. तसेच एक मुलगी ऊसाच्या शेतातून बाहेर पळत आल्याची दिसून आली.

यावेळी मुलगी खूप घाबरलेली दिसून आली होती. तसेच तिचे कपडे विस्कटलेल्या अवस्थेत दिसून आले. यावेळी तांबे यांनी सदर तरुणीची चौकशी करण्यास सुरुवात केली असता एक तरुण ऊसाच्या बाहेर आला. तांबे यांना पाहताच त्या तरुणाने त्या ठिकाणावरून धूम ठोकली. सदर मुलीला पाणी पिण्यास देऊन तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.

याबाबत तिला माहिती विचारली असता तिने सांगितले की, सदर तरुणी ही बिहारची असून ती नातेवाईकांबरोबर आली होती. तरुणीला पुण्याला यायचे असल्याने ती कल्याण स्थानकावर उतरून रेल्वेने पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेत बसली होती. रेल्वेत तिची काही बिहारी नागरिकांशी ओळख झाली होती. या ओळखीतून एका तरुणाने तिला पुण्यात सोडतो असे सांगितले होते. तिला पुणे माहिती नसल्याने तिला उरुळी कांचन रेल्वे स्थानकावर घेऊन आला.

दरम्यान, रेल्वे स्थानकावर उतरून ऊसाच्या पलीकडील बाजूला टेम्पो मिळतात व त्या टेम्पोमधून आपण पुण्याला जाऊ असे सांगून तिला उसाच्या शेतात घेऊन गेला. यावेळी सदर तरुणाने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, धनंजय तांबे यांच्या प्रसंगावधनामुळे तरुणीवरील प्रसंग टळला गेला. धनंजय तांबे यांनी सदर तरुणीला समजावून सांगून उरुळी कांचन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून सदर तरुणीला त्यांच्या स्वाधीन केले. तरुणी अथवा तीच्या नातेवाईकांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

3 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

3 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

4 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

4 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

4 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

9 तास ago