महाराष्ट्र

सरपंचाची खुर्ची रिकामी होणार! राज्यातील 14,237 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचे आदेश

मुंबई: राज्यातील ग्रामीण राजकारणात मोठा बदल घडणार असून येत्या काळात राज्यातील तब्बल 14 हजार 237 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार आहेत. ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत असताना निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या खुर्च्या काही काळासाठी रिकाम्या राहणार आहेत.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आधीच रखडल्या आहेत. त्याच धर्तीवर आता जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही किमान सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या काळात लोकप्रतिनिधी नसून सरकारी प्रशासक ग्रामपंचायतींचा कारभार पाहणार आहेत.

ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय

ग्रामविकास विभागाने 14 ऑगस्ट 2020 च्या शासन निर्णयाचा आधार घेत प्रशासक नियुक्तीचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. या निर्णयानुसार ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुका होईपर्यंत प्रशासक नेमण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

विभागनिहाय ग्रामपंचायतींची संख्या

छत्रपती संभाजीनगर विभाग: 4,134 ग्रामपंचायती

पुणे विभाग: 2,870 ग्रामपंचायती

नाशिक विभाग: 2,476 ग्रामपंचायती

अमरावती विभाग: 2,451 ग्रामपंचायती

नागपूर विभाग: 1,508 ग्रामपंचायती

कोकण विभाग: 798 ग्रामपंचायती

निवडणुका का लांबल्या?

आरक्षणाचा पेच अद्याप सुटलेला नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामपंचायतींची मुदत संपत असताना निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसल्याने प्रशासक नियुक्तीचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

ग्रामीण राजकारणावर परिणाम

या निर्णयामुळे ग्रामीण भागात ‘प्रशासक राज’ सुरू होणार असल्याची चर्चा आहे. गावच्या विकासकामांवरील निर्णय आता लोकनियुक्त सरपंचाऐवजी प्रशासक घेणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता असून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत पुढील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

5 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

5 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

6 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

6 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

6 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

6 तास ago