आरोग्य

आधी सांधे दुखी, मग डोकंदुखी, मग ताप; त्या नव्या व्हायरसची लक्षणं व उपचार

आजार कितीही मोठा असला तरी त्याच्यावर अनेक घरगुती उपाय उपलब्ध आहेत. मागील कित्येक वर्षांपासून लहान लहान उपचारांमुळे रुग्णांचा आजार बरा होण्यासाठी हातभार लागत आहे. सध्या पुण्यात व्हायरल तापाची साथ सुरू आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आणि उपचार देत आहेत डॉ. अमित भोरकर.

चिकनगुनिया हा असा व्हायरस आहे ज्याच्या शरीरात येण्यामुळे ताप येतो. चिकनगुनिया चे मुख्य लक्षण हे ताप आहे. हा व्हायरस सर्वात आधी तंजानिया येथे आढळून आला होता. जेव्हा त्या ठिकाणी हा वायरस आढळून आला त्यानंतर त्यावर तिथे रिसर्च करून त्याला चिकनगुनिया असे नाव देण्यात आले. हा व्हायरस इ. सन 2006 मध्ये भारतात सर्वप्रथम आढळला. सर्वप्रथम तो अंदमान द्वीप वरती सापडला त्यानंतर हळूहळू भारतात सर्वत्र तो पसरत गेला.

चिकनगुनिया हा काही जास्त मोठा आजार नाही किंवा तो नीट होणारच नाही असे देखील नाही. याचे अनेक असे उपाय आहेत ज्यामुळे हा आजार ठीक होऊ शकतो. कुठलाच आजार मोठा नसतो फक्त आपले सकारात्मक विचार आणि त्या आजाराविरुद्ध लढण्याची ताकद या दोनच गोष्टी आपल्या आजार पळवून लावू शकतात. हा आजार एवढा घातक नाही की ज्यामुळे आपला मृत्यू होऊ शकेल. सामान्य व्यक्ती या आजारातून पूर्णपणे बरा होऊ शकतो, फक्त थोडा वेळ द्यावा लागतो.

चिकन गुनियाची कारणे

या आजाराचे मुख्य कारण पहिले तर हा आजार मच्छराच्या चावल्यामुळे होतो. हे मच्छर आपल्या आसपास साठलेल्या घाणीमुळे तयार होतात. यामध्ये हजारो डास तयार झालेला असतात, त्यामधील काही अतिशय विषारी असतात. चिकन गुनिया हा आजार वेळेस एडेस एलबोपिक्टस तसेच एडेस इज्यप्ती नावाच्या मच्छरने चावल्यास होतो. हा व्हायरस मुख्यता जनावरांमध्ये किंवा पक्षांमध्ये असतो व तिथूनच आजूबाजूच्या परिसरात पसरतो.

चिकन गुनियाची लक्षणे

चिकन गुनिया मध्ये एक विशिष्ट प्रकारची ताप व्यक्तीला येते. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये असे काही लक्षणे आढळून येतात जे पुढील प्रमाणे आहेत.

सुरुवातीच्या काळामध्ये हात आणि पायामध्ये खूप वेदना होतात. या वेदना मुख्यत्वे सांध्यांमध्ये जास्त होतात, याचबरोबर डोकेदुखी देखील वाढते.

रुग्णाला थंडी वाजून येते व त्यानंतर तीव्र असा ताप येतो. हा ताप पाच-सहा दिवस असाच कमी जास्त होत राहतो. ताप 102 ते 103 डिग्री सेल्सिअस पर्यंत असू शकतो.

हातापायांना सूज येते व खूप वेळा शरीरावरती दाने दाणे आढळून येतात.

या आजाराची लक्षणे कमीत कमी १०-१२ दिवस राहतात. या आजाराचे बरेच पेशंट पाहिल्यानंतर असे लक्षात आले की सुरुवातीच्या सहा दिवसांमध्ये या आजाराचा खूप जास्त त्रास होतो. नंतरच्या पाच सहा दिवसांमध्ये ताप हळूहळू कमी होऊन आजार बरा होतो.

तापाचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे या आजारात शरीरामधील पाचनक्रिया (Metabolism) खूप कमी होते, त्यामुळे खाल्लेले पचत नाही व त्यामुळे अशक्तपणा येण्याची शक्यता असते.

चिकन गुनियाची तपासणी

कुठल्याही आजाराच्या उपचारासाठी त्या आजाराची तपासणी करून घेणे खूप महत्त्वाचे असते, ज्यामुळे आपल्या हा आजार झाला आहे की नाही हे लक्षात येईल व आपण त्यावर उपचार घेऊ शकु.

चिकनगुनिया झालेल्या रुग्णांमध्ये सामान्यतः सीबीसी, आरटीपीसीआर, इएलएसए, सीएचआयकेवी या तपासण्या केल्या जातात. या सर्व तपासण्या डॉक्टर रुग्णाच्या लक्षणांवरून ठरवतात यामध्ये काही तपासण्या वाढू किंवा कमी होऊ शकतात. म्हणून स्वतःहून या तपासण्या करू नये.

चिकनगुनिया व घ्यावयाची काळजी

प्रत्येक आजार बरा होण्यासाठी काही ना काही उपाय असतात ते आपण प्रत्येक जणच करतो, परंतु आजार होण्याआधी त्या आजाराची काळजी घेणे खूप गरजेचे असते. ज्यामुळे आपल्याला आजारच होऊ नये किंवा एक वेळ झाल्यास परत परत तो आजार आपल्याला होऊ नये.

चिकनगुनिया संदर्भात काय काळजी घ्यावी

स्वच्छता: आपल्याला सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व माहीतच आहे, म्हणूनच आपल्या आसपास आजूबाजूच्या परिसरात आपण नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे. जर एखाद्या ठिकाणी घाण पाणी साठले असेल ज्यामध्ये मच्छर तयार होत असतील तर ते बाजूला काढणे किंवा सांडून देणे हे चिकनगुनिया रोखण्यासाठी अतिशय गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूच्या नाल्यांमध्ये औषधी फवारने हे देखील खूप गरजेचे आहे. जिथे स्वच्छता असते तिथे आजार खूप कमी प्रमाणात आढळून येतात.

खाण्यापिण्याकडे लक्ष देणे: आपल्याला आपल्या खाण्या पिण्याकडे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे, बदलत्या वातावरणाचा अंदाज घेऊन त्या वातावरणात कुठले अन्न योग्य आहे ते निवडून त्याचा आहारामध्ये समावेश करावा. खाण्या पिण्याच्या वस्तू या योग्य ठिकाणाहून व क्वालिटी तपासूनच घ्या. आणि पावसाळ्याच्या दिवसात तर याची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

6 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

6 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

6 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

6 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

6 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

6 तास ago