महाराष्ट्र

वांद्रे (पू) जागेवर राज्याचे नविन महा पुराभिलेख भवन बांधणार

मुंबई: वांद्रे (पू) येथील 6691 चौ.मी. जागेवर राज्याचे नविन “महा पुराभिलेख भवन” बांधण्यात येणार असल्याची घोषणा आज विधानसभेत सांस्कृतीक कार्य मंत्री ॲड आश‍िष शेलार यांनी केली.

राज्याच्या स्वतंत्र वस्तू संग्रहालय व कला भवनाची बीकेसी मध्ये उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री शेलार यांनी केली होती त्यानंतर आज त्यांनी आणखी एक मोठी घोषणा विधानसभेत केली. मंत्री ॲड आश‍िष शेलार यांनी आज विधानसभेत केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालय हा विभाग असुन पुराभिलेख संचालनालयाची स्थापना 1821 साली झाली होती. संचालनालयाचे मुख्यालय मुंबई येथे असुन पुराभिलेख विभागाकडे असलेल्या 17.5 कोटी कागदपत्रांपैकी सुमारे 10.5 कोटी कागदपत्रे या मुंबई स्थित मुख्यालयात आहेत. सन 1889 पासुन हे मुख्यालय सर कावसजी रेडिमनी बिल्डिंग म्हणजेच एल्फिस्टन कॉलेजच्या इमारतीमध्ये असून तेथे या कागदपत्रांचे जतन व संवर्धन करण्याचे काम अव्याहतपणे चालु आहे. काळानुरुप अत्याधुनिक पध्दतीने कागदपत्रांचे जतन व संवर्धन करणे, जुनी कागदपत्रे जतनाकरिता स्विकारणे अशा अनेक गोष्टींवर जागेअभावी मर्यादा येत आहेत.

पुराभिलेख संचालनालयामध्ये उपलब्ध दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रांचा हा राष्ट्रीय महत्वाचा ठेवा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने पुराभिलेख संचालनालयाच्या वांद्रे (पू) येथील 6691 चौ.मी. जागेवर नविन “महा पुराभिलेख भवन” बांधण्यात येणार आहे. तापमान व आर्द्रता नियंत्रित अभिलेख कक्ष, स्वतंत्र बांधणी शाखा, प्रतिचित्रण शाखा, देशविदेशातून येणाऱ्या इतिहास संशोधकांसाठी अत्याधुनिक संशोधन कक्ष, स्वतंत्र प्रदर्शन दालन अशा अनेक सोई सुविधांनी युक्त अशी ही इमारत असेल, असे ॲड आश‍िष शेलार यांनी जाहीर केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…

20 तास ago

कडूलिंबातील औषधी गुण

कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे…

20 तास ago

औषधांच्या वेळा पाळण्यापेक्षा जेवणाच्या वेळा पाळ्णं हे जास्त फायद्याच

केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी…

20 तास ago

ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का लावून निवडणुका नकोत! विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा

‘आरक्षणाच्या जागा कमी झाल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार’; ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी केंद्राकडे पाठपुराव्याची मागणी…

20 तास ago

शिरूर नगरपरिषदेत राजकीय भूकंप! उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांची खुर्ची अविश्वास ठरावाने धोक्यात

२० नगरसेवकांचे ठरावाला समर्थन; गादियांसह राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांचा सभात्याग शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात…

1 दिवस ago

शिरूर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटांत तुफान हाणामारी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून चक्क पोलीस ठाण्यासमोरच दोन…

1 दिवस ago