मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक भेट उत्साहवर्धक ठरली. या वेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा विद्यार्थ्यांशी झालेला संवाद विशेष आकर्षण ठरला.
डॉ. गोऱ्हे यांनी अत्यंत सोप्या भाषेत विधिमंडळाची कार्यपद्धती समजावून सांगताना शिस्त, नियम आणि सभागृहातील कामकाजाची रचना स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनीही उत्सुकतेने प्रश्न विचारत संवाद रंगवला.
मंत्री आदिती तटकरे यांनी मुलांशी गप्पांच्या माध्यमातून शासनाचे महत्त्वाचे निर्णय आणि धोरणे समजावून सांगितली. तसेच अनिकेत तटकरे यांनी दोन्ही सभागृहांची सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमाला जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, संबंधित अधिकारी आणि शाळेचे प्रतिनिधी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी ही भेट केवळ शैक्षणिक न राहता लोकशाहीची कार्यपद्धती जवळून समजून घेण्याचा प्रेरणादायी अनुभव ठरली.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…