महाराष्ट्र

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने नगरविकास विभागाने स्वतंत्र आणि परिणामकारक कार्यप्रणाली विकसित करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

दि. १६ एप्रिल रोजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महिला सुरक्षेसंदर्भात निवेदन सादर केले होते. त्यानंतर आज विधान भवनात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नगरविकास विभागासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. बैठकीस उपसचिव अजिंक्य बगाडे तसेच अक्षरा सेंटर, मुंबईच्या सहसंचालक नंदिनी शाह यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना उपसभापतींनी सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यावर विशेष भर देण्याचे सांगितले. उद्याने, क्रीडांगणे, मॉल्स आणि बाजारपेठांमध्ये महिलांच्या गरजेनुसार सुविधा उभारण्याबरोबरच स्वच्छ व मानक कार्यपद्धतीची पाळणाघरे आणि शिशुगृहे उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. सार्वजनिक उद्यानांमध्ये ठराविक वेळ महिलांसाठी आणि लहान मुलांसह येणाऱ्या कुटुंबांसाठी राखीव ठेवण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला.

तसेच, महानगरपालिका क्षेत्रातील निर्जन व अंधाऱ्या भागांमध्ये पुरेशी प्रकाशयोजना करणे, बाजारपेठा, घाट आणि बसथांब्यांवर स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध करणे आणि महिला सुरक्षेसंदर्भातील योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले.

महिलांपर्यंत शासकीय योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये महिला मदत केंद्र स्थापन करण्याची सूचना देण्यात आली. याशिवाय जेंडर रिसोर्स सेंटर उभारणे, तक्रार निवारण प्रणाली अधिक सक्षम करणे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, राज्यातील सर्व महापालिकांच्या परिवहन सेवांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला. बसस्थानके, डेपो आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी नगरविकास विभागाने संबंधित परिवहन विभागांशी समन्वय साधून लवकरच बैठक आयोजित करावी, असेही उपसभापतींनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

7 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

7 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

7 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

22 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

23 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

23 तास ago