महाराष्ट्र

कोब्रासोबत मस्ती करतानाचा स्टंट तरुणाला पडला भारी…

कर्नाटक: साप असं जरी नावही ऐकलं तर बहुतेकांना घाम फुटतो. पण असे काही लोकही आहेत, ज्यांना साप म्हणजे एखादं खेळणंच वाटत. काही लोक सापासोबत मस्ती करताना, त्यांच्याशी जीवघेणे खेळ खेळताना दिसतात. मात्र हा खेळ अनेकदा त्यांच्या अंगलटही येतो. आजवर असे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मस्ती करणाऱ्या एका तरुणाला सापाने चांगलाच धडा शिकवला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ कर्नाटकातील आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती जीवाची पर्वा न करता कोब्राबरोबर स्टंट करत आहे. या तिन्ही सापांना तो वारंवार डिवचण्याचा प्रयत्न करतोय. यातील एका सापाने या तरुणाला अशा ठिकाणी चावा घेतला, ज्यामुळे या तरुणाची बोलतीच बंद झाली. आपल्यासोबत असं काही होईल याचा स्वप्नातही या तरुणाने विचार केला नसेल.

या व्हिडीओत हा तरुण सापाची शेपटी हातात धरुन आपले करतब दाखवतो आहे. त्याचवेळी एक साप या तरुणावर अचानक हल्ला करतो. सापाने अचानक हल्ला केल्याने या तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकते. कशीबशी तो सापाच्या तावडीतून आपली सुटका करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, सापाने त्याच्या पायाला चावा घेतो.

दरम्यान, साप चावल्यानंतर या तरुणाला कर्नाटकातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. सध्याच्या तरुणाईमध्ये स्टंटची क्रेज वाढलेली दिसले. सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी अनेकजण जीवघेणे स्टंट करतात. मात्र, वन्यप्राण्यांसोबत स्टंट करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यातच तुमचा जीव धोक्यात येण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारचे स्टंट करु नका.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

8 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

11 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

13 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago