महाराष्ट्र

कारगिल युद्धाचा थरार आता प्रत्यक्ष पाहता येणार

द्रास सैन्य स्मारकातील ‘लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो’साठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

मुंबई: कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी ज्या त्वेषाने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने शत्रूशी लढा दिला, त्या लढाईचा थरार आता इथे भेट देणाऱ्या प्रत्येक भारतीय पर्यटकाला प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. जून महिन्यात भारतीय लष्कर आणि सरहद संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कारगिल युध्द विजय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सरहद शौर्यथॉन-2025 (मॅरेथॉन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने द्रास युद्ध स्मारकाला भेट देणार्‍या पर्यटकांसाठी रूपये 3 कोटी खर्च करून ‘लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो’ सुरु करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. याच लाईट अँड साऊंड शोची निर्मिती आता भारतीय लष्कराने सुरू केली आहे.

या ‘लाईट अँड साऊंड शो’ ची निर्मिती करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने 22 जून 2025 रोजी 3 कोटी रूपये भारतीय सैन दलाकडे हस्तांतरित केले होते. कारगिल सारख्या भौगोलिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आणि दुर्गम क्षेत्रात पार पडलेल्या या युद्धात सैनिकांना येणार्‍या अडचणी सर्वसामान्य लोकांना कळव्यात यासाठी हा शो तयार केला जाणार आहे. सैन्य दलाकडून हा शो सुरू करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे.

यासोबतच स्थानिक जिल्हा रूग्णालयाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या वतीने 26 व्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने सिटी स्कॅन मशीन आणि काही वैद्यकीय उपकरणे देण्याचा निर्णय घेतला आहे. सरहद संस्थेच्या वतीने संजय नहार यांनी ही माहिती दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

5 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago