पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिर आणि काळाराम मंदिर येथे घेतले दर्शन
नाशिक: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने रामकुंड, पंचवटी येथे गोदामहाआरती केली. गंगामाईच्या पूजनाने त्यांनी धार्मिक श्रद्धा व्यक्त केली आणि नदी स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी जनसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिर आणि काळाराम मंदिर येथे दर्शन घेतले. त्यांनी मंदिरात विधीवत पूजा केली आणि राज्याच्या प्रगती व जनकल्याणासाठी प्रार्थना केली.
विशेष म्हणजे, मंदिर व्यवस्थापन आणि कामकाजावरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. मंदिराच्या स्वच्छता, भाविकांसाठी उपलब्ध सोयीसुविधा आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत त्यांनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. या दौऱ्यात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून या भेटीला विशेष महत्त्व लाभले आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…
१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…
लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…
नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…
चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…
राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…