महाराष्ट्र

तुळजापूरच्या महिलांनी साधला डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद

पुणे: तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये भोपे कुटुंबातील महिलांना पूजा आणि इतर पूजा विधी करण्याचा मान मिळावा, यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी तुळजापूर मधील स्थानिक महिलांनी केलेल्या व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला.

महिलांनी मंदिराच्या देवीची अलंकारपुजा करण्याची पूर्वीची परंपरा शासनाने आताही सुरू ठेवावी, अशी मागणी केली. दिनांक १२ फेब्रुवारी रोजी नीलमताईंनी शासनाकडे दिलेल्या मागण्यांचे स्वागत या महिलांनी केले आहे. या महिला त्यांच्या मागण्यांचे निवेदनही डॉ. गोऱ्हे यांच्याकडे देणार आहेत. या महिलांना यामुळे देवीच्या आराधनेचा अधिकार मिळणे शक्य होणार आहे. शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय विभागाचे मंत्री यांना निवेदनाद्वारे दोन दिवसांपूर्वी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

5 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

5 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

5 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

5 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

5 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

9 तास ago