महाराष्ट्र

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम लवकर पूर्णत्वास न्यावे; डॉ. नीलम गो-हे

पुणे: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे,” असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दिले.

महात्मा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम सुरू असून,याबाबतच्या आयोजित बैठकीत त्या म्हणाल्या की, “हे स्मारक उशिरा होत असले तरी पण गुणवत्तापूर्ण होत आहे.मात्र काम पूर्णत्वास नेण्यासाठी आता अधिक गती आवश्यक आहे. त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना नमूद केले की, “पुणे हे सामाजिक चळवळींचे केंद्र राहिले आहे. अशा ठिकाणी फुले दांपत्यांचे स्मारक केवळ पुणेकरांसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरेल.

डॉ. गो-हे यांनी स्मारक परिसराचे नियोजन, उभारणीसाठी लागणाऱ्या निधीच्या वापराची माहिती ,समितीची रचना व कार्यपद्धती आणि त्याच्या सध्याच्या प्रगतीची चौकशी केली. स्मारकाचे परिसरातील मालक,भाडेकरू कुटुंबांना मोबदला,त्यांचे पुनर्वसन,जमिन अधिग्रहण,स्मारकांची डागडुजी,आवश्यक सोयीसुविधा,स्मारकाचे ठिकाणी सुरक्षा व्यवस्था या विषयात संबंधित विभागांनी आपली जबाबदारी वेळेत पार पाडावी यावर त्यांनी भर दिला.त्यांनी सुचवले की, “यामध्ये कोणतीही दिरंगाई न होता तातडीने कामे पूर्ण केली जावीत व महात्मा फुले जयंती पुर्वी सर्व कामकाज पुर्ण करावे.”

या वेळी स्मारक समितीचे अध्यक्ष निलेश श्री गिरमे,अधीक्षक अभियंता श्री गव्हाणे,उपायुक्त श्री दांगट,शिक्षणाधिकारी श्री कारेकर व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

3 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago