महाराष्ट्र

गली गली में शोर है, निवडणूक आयोग चोर है’

मतचोरी विरोधात राहुल गांधींचा लढा लोकशाही वाचवण्यासाठी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे मोठे स्कँडल पुराव्यासह उघड केले आहे. भाजपा निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करत असून हा विषय एकट्या काँग्रेस पक्षापुरता मर्यादीत नसून तो सर्वांचा आहे. राहुल गांधी लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढा देत असून या लढ्यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

देशतील काही निवृत्त अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पत्र लिहिल्याच्या मुद्द्यावर नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, गली गली में शोर है, निवडणूक आयोग चोर है, हे आता सर्वांना समजले आहे. हा विषय केवळ एका काँग्रेस पक्षाचा नाही तर सर्वांचाच आहे, नागरिकांचा आहे, मीडियाचा आहे, त्यामुळे राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या या लढाईत सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असे सपकाळ म्हणाले.

महाराष्ट्र गुजराकडे गहाण ठेवला…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली, त्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा महायुतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री असून महाराष्ट्रातील सर्व निर्णय हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच घेतात त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरुबरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा दोन दिवसापूर्वीच अमित शाह यांना भेटले होतो त्यानंतर पार्थ पवार यांना पुण्यातील जमीन घोटाळ्यातून क्लिन चिट देण्यात आली. गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये अंतर्गत टोळी युद्ध सुरु आहे आणि त्यातून नेहमी दिल्लीत जावे लागते, असेही सपकाळ म्हणाले.

आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर…

मनसेसोबत आघाडी वा युती करण्यासाठी मुंबई वा महाराष्ट्रातून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आघाडी करण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढावी अशी असंख्य कार्यकर्त्यांची भावना आहे, त्याचा आदर पक्षाने राखला पाहिजे अशी परिस्थिती आहे. आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. इंडिया आघाडी बाहेरचा पक्ष आघाडीत येणार असेल तर तसा प्रस्ताव सादर करावा त्यावर राष्ट्रीय पातळीवर निर्णय होईल. शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना त्यांच्या पक्षाची ध्येयधोरणे ठरवण्याचा अधिकार आहे, त्यांनी कोणाशी युती करावी हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, असेही सपकाळ म्हणाले..

काँग्रेसला महाराष्ट्र धर्म शिकवू नये…

मनसेच्या आरोपाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मराठी हा अस्मितेचा मुद्दा आहे, तो जोपासण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. मराठी हा केवळ भाषेपुरता विषय नसून मराठी हा महाराष्ट्र धर्म आहे आणि महाराष्ट्र धर्म काँग्रेसला कोणी शिकवण्याची गरज नाही. इयत्ता पहिल्यापासून हिंदी सक्ती करण्याचा मुद्दा पुढे आला त्यावेळी सर्वात आधी काँग्रेसने विरोध केला होता, याचे स्मरण यानिमित्ताने करुन देत आहोत असेही सपकाळ म्हणाले.

नगरपालिका निवडणूक प्रचार…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विदर्भातील अमरावती, अकोला जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या. नागपूरहून ते अमरावती जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाले. त्यानंतर अंजनगाव सुर्जी, अकोट, बाळापूर येथे काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

4 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

5 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

5 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

5 तास ago

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य; धीरेंद्र शास्त्रीविरोधात संतापाची लाट

मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र…

5 तास ago

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

7 तास ago