महाराष्ट्र

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना मिळणार बक्षीस! नितीन गडकरींची मोठी घोषणा

औरंगाबाद: रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘गुड समॅरिटन’ (मदतनीस) योजनेत ऐतिहासिक बदल केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत ही महत्त्वाची घोषणा केली आहे.

मदत करणाऱ्यांसाठी मोठं प्रोत्साहन

अपघातातील जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्याला थेट ₹25,000 रोख बक्षीस देण्यात येणार. यापूर्वी ही रक्कम फक्त ₹5,000 होती, आता पाचपट वाढ करण्यात आली आहे. बक्षीसासोबत प्रशस्तीपत्र देखील दिले जाणार.

‘गोल्डन अवर’मध्ये मदत केल्यास सन्मान

अपघातानंतरच्या पहिल्या 1 तासाला ‘गोल्डन अवर’ मानले जाते, या वेळेत मदत करणाऱ्यांना विशेष प्रोत्साहन

मदतनीसाला ‘राह-वीर’ या सन्माननीय पदवीने गौरवले जाणार

जखमींसाठी 1.5 लाखांपर्यंत मोफत उपचार

अपघातानंतर रुग्णालयात दाखल झाल्यावर अपघातग्रस्तांना पहिल्या 7 दिवसांसाठी ₹1.5 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार असून यासाठी सर्व खर्च केंद्र सरकारकडून केला जाणार आहे.

योजना कुठे लागू होणार

राष्ट्रीय महामार्ग

राज्य महामार्ग

जिल्हा रस्ते

ग्रामीण भागातील रस्ता

ही योजना केवळ हायवेपुरती मर्यादित नाही

10 मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचणार

अपघातस्थळी अवघ्या 10 मिनिटांत अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी राज्य सरकारांशी करार सुरू असून टेक्नॉलॉजीवर आधारित प्रगत हेल्पलाइन सिस्टीम तयार केली जात आहे.

कायदेशीर अडचणींपासून पूर्ण संरक्षण

अपघातग्रस्तांना मदत केल्यानंतर पोलीस चौकशीची कोणतीही सक्ती नाही तसेच कोर्टात साक्ष देण्याची जबरदस्ती नाही. त्यांना ‘गुड समॅरिटन’ कायद्याअंतर्गत पूर्ण संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे आता निर्भयपणे जखमींना मदत करता येणार

मानवतेला सलाम करणारी योजना

ही योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही, तर मानवतेला दिलेला मान आहे. आज मदत करा, उद्या कुणाचं तरी आयुष्य वाचवा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

5 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago