महाराष्ट्र

आज माझा मोठा भाऊ हरपला! अजित पवारांच्या निधनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री शिंदेंची साश्रू नयनांनी श्रद्धांजली

ठाणे: “आज माझा मोठा भाऊ हरपल्यासारखी भावना आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्त्व होते,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोकभावना व्यक्त केली.

बारामतीजवळ विमान उतरत असताना झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावरून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.अपघाताची बातमी मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांच्याशी असलेल्या आपल्या आठवणींना उजाळा दिला.

“आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं. अजित पवार पहाटेपासून कामाला लागायचे. सकाळी सहा वाजताही त्यांनी आदेश दिल्याचे मी स्वतः पाहिले आहेत. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करूनच ते बोलायचे. रोखठोक स्वभाव असला, तरी मनाने ते अत्यंत निर्मळ होते,” असं शिंदे यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की, मंत्रिमंडळात जेव्हा राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा व्हायची, तेव्हा अजित पवार नेहमीच वास्तव मांडायचे आणि योग्य दिशा सुचवायचे. “त्यांचा अनुभव, अभ्यास आणि प्रशासनावरील पकड आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरायची,” असंही त्यांनी नमूद केलं.

काल-परवाच एका कार्यक्रमात त्यांची भेट झाल्याची आठवण सांगताना शिंदे भावूक झाले.“आज त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबाचंच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. मी त्यांना मनापासून आदरांजली अर्पण करतो,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक निर्भीड, धडाडीचा आणि अनुभवी नेता गमावला असून, त्यांच्या कार्याची आठवण कायम जनतेच्या मनात राहील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

16 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

19 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

21 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago