व्यापार हत्यार बनलं असून हा हिंदुस्थानसाठी वेकअप कॉल

मुंबई: अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरू झाली असून यामुळे हिंदुस्थानवर मोठा आर्थिक बोझा पडणार आहे. याचा विविध क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. याबाबत आता ‘रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया’चे माजी गव्हर्नर आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. रघुराम राजन यांनी मोठे विधान केले आहे.

जागतिक पातळीवर व्यापाराला हत्यार बनवले जात असून हिंदुस्थानसाठी हा वेकअप कॉल असल्याचे रघुराम राजन म्हणाले. हिंदुस्थानने एका व्यापारिक भागीदारावरील अवलंबवित्व कमी केले नाही तर अशा अडचणी येतच राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.

रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने हिंदुस्थानवर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला आहे. यामुळे हिंदुस्थानातून निर्यात होणाऱ्या वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ लागू झाला असून याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. याबाबत बोलताना रघुराम राजन म्हणाले की, जागतिक पातळीवर व्यापार, गुंतवणूक आणि वित्त याचा हत्यार म्हणून वापर होऊ लागला आहे. त्यामुळे हिंदुस्थानने काळजीपूर्वक पावले उचलायला हवीत. हा वेकअप कॉल असून आपण एका देशावर अवलंबून राहू नये. पूर्वेकडील देश, युरोप आणि आफ्रिकेकडे मोर्चा वळवावा. योग्य उपाययोजना केल्यामुळे आपल्याला 8 ते 8.5 टक्के विकासदर साधून रोजगार निर्मिती करता येईल.

ते पुढे म्हणाले की, अमेरिकेसोबत व्यापार सुरू ठेवणे आवश्यक असून रशियाकडून तेल खरेदीच्या निर्णयाचेही पुनर्मूल्यांकन करावे लागेल. आपल्याला हा विचार करावा लागेल की, यामुळे फायदा होतोय की नुकसान. एका बाजुला रशियाकडून घेतलेले तेल रिफाईन करून नफा कमवत आहोत, तर दुसर्‍या बाजुला निर्यातदार टॅरिफच्या माध्यमातून जास्त शुल्क भरत आहेत. त्यामुळे याचा विचार करणे योग्य ठरेल.

आपण एकावर अवलंबून न राहता पर्याय शोधावे. या संकटाला संधी म्हणून पहावे. चीन, जपान, अमेरिका किंव इतर कुठल्याही देशासोबत काम करा, पण त्यांच्यावर अवलंबून राहू नका. पर्याय शोधा, शक्य तितके आत्मनिर्भरतेवर भर द्या, असे राजन म्हणाले. अमेरिकेच्या टॅरिफमुळे माशांची शेती करणारे शेतकरी, कापड उत्पादक, लहान निर्यातदार यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा लोकांची उपजीविका धोक्यात येईल. अर्थात यामुळे अमेरिकन ग्राहकांनाही खिसा मोकळा करावा लागेल. कारण 50 टक्के टॅरिफमुळे त्यांना जास्त पैसे मोजून वस्तू खरेदी कराव्या लागतील, असेही ते म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

7 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

7 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

7 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

7 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

13 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

14 तास ago