संभाजीनगर: नाशिक- छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वैजापूर शहराजवळील रोटेगाव परिसरातल्या फार्मसी महाविद्यालयात औषधी निर्माणशास्त्राचे पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकविले जातात. याच महाविद्यालयातील एका 55 वर्षीय प्राध्यापकाची वैजापूर शहरातील एका युवकाशी ओळख झाल्यानंतर या नराधम प्राध्यापकाने ‘तुला मी फार्मसी महाविद्यालयात प्रवेश देऊन उत्तीर्ण करून देता’ असे आमिष दाखवून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले.
त्याच्या या दुष्कृत्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे प्राध्यापकाच्या प्रतापाचे बिंग फुटले. त्याच्या या ‘कर्तृत्वामुळे’ महाविद्यालय प्रशासनासह संस्थाचालकास शरमेने मान खाली घालण्याची नामुष्की ओढवली गेली. आपल्या कुकृत्याची बिंग फुटून चित्रफित व्हायरल झाल्याची भणक लागताच, या प्राध्यापकाने धूम ठोकली.
सदरील संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या चित्रफितीने हे प्रकरण पोलिस यंत्रणेपर्यंत गेले आहे. त्यामुळे संस्थाचालकांसह प्राध्यापकामागे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. पण आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही अधिकृत कारवाई केली नसून, पोलिसांकडे देखील याबाबत कोणतेही लेखी तक्रार आलेली नाही.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…