महाराष्ट्र

विद्यापीठांत आदिवासी अध्यासन केंद्रांना गती; आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या नव्या संधी

मुंबई: राज्यातील आदिवासीबहुल भागातील विद्यापीठांमध्ये आदिवासी अध्ययन, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आदिवासी अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे आदिवासी अध्ययन व संशोधनाला गती मिळणार असून आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होतील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

मंत्रालयात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी अध्यासन केंद्रांना निधी उपलब्ध करून देण्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आदिवासी विकास विभागाचे सहसचिव मच्छिंद्र शेळके तसेच मुंबई, जळगाव, नांदेड, अमरावती आणि गडचिरोली येथील विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले की, जळगाव, नांदेड आणि मुंबई विद्यापीठात सध्या आदिवासी अध्यासन केंद्र कार्यरत आहेत. आता अमरावती आणि गडचिरोली विद्यापीठात नव्याने ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांसाठी आदिवासी विकास विभागाकडून प्रत्येकी ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यातून संशोधन उपक्रम, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.

या केंद्रांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासासाठी संशोधनाधारित उपक्रम राबवले जाणार आहेत. महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची लोकसंस्कृती, भाषा, परंपरा आणि इतिहास जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कामही या केंद्रांतून केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले की, या अध्यासन केंद्रांमुळे आदिवासी समाजाच्या पारंपरिक ज्ञान, संस्कृती आणि जीवनशैलीचा अभ्यास व संवर्धन होईल. तसेच शिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून आदिवासी युवकांना नवीन संधी उपलब्ध होऊन त्यांचा सर्वांगीण विकास साध्य होण्यास मदत होईल. आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च व तंत्र शिक्षणातील सहभाग वाढवून त्यांना रोजगारक्षम बनविणे हेही या केंद्रांचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

8 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

9 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

10 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

10 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

10 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

10 तास ago