महाराष्ट्र

NEET पेपर लिक प्रकरणी NTA महासंचालकांच्या अटकेची मागणी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: नीट (NEET) पेपर लिक प्रकरणी राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंह यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. भाजप सरकारच्या काळात गुन्हेगारांना अभय मिळत असल्याने पेपर लिक माफिया मोकाट सुटले असून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

सपकाळ म्हणाले की, ३ मे रोजी देशभर पार पडलेल्या NEET परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची वेळ आली आहे. वर्षभर मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा मानसिक धक्का असून, फेरपरीक्षेमुळे सुमारे २२ लाख विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांचा चुराडा झाला असल्याची टीका त्यांनी केली.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा NEET परीक्षेत गोंधळ झाल्याचा आरोप करत सपकाळ म्हणाले की, २०२४ मधील पेपरफुटीप्रकरणी सुरुवातीला सरकारने आरोप फेटाळले होते, मात्र नंतर बिहार आणि हजारीबाग येथे गैरप्रकार झाल्याचे मान्य करण्यात आले. दोषींवर कारवाईचे आश्वासन देऊनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही.

भाजपा सरकारवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, काँग्रेस किंवा इतर पक्षांचे सरकार असताना भाजपा मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असे, मात्र २०१४ नंतर कितीही गंभीर घटना घडल्या तरी भाजपाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचे दिसत नाही.

महाराष्ट्रातील पेपरफुटीच्या घटनांचाही उल्लेख करत सपकाळ यांनी राज्य सरकारवर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही अनेक पेपरफुटीच्या घटना घडल्या, मात्र त्यावर कठोर कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला. तसेच २ मे २०२६ रोजी झालेल्या एसआरपीएफ दौंड शिपाई भरती परीक्षेतील १०० पैकी ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातून जशास तसे विचारण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी हा देखील स्पर्धा परीक्षेतील गंभीर गैरप्रकार असल्याचे म्हटले.

“भाजपा सरकारला परीक्षा देखील व्यवस्थित घेता येत नाहीत, हे त्यांच्या अकार्यक्षमतेचे लक्षण आहे. देशभरातील विद्यार्थी आणि पालक या कुचकामी सरकारला माफ करणार नाहीत. काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

1 तास ago

नांदेडमध्ये शिवसेनेला बळ; असंख्य पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनविस्ताराला आणखी बळ मिळाले आहे. शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि…

2 तास ago

अहिल्यानगरमधील गंभीर गुन्ह्यातील आरोपी पुणे LCB जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील…

6 तास ago

पुणे; दूध भेसळ प्रकरणात कारवाईचा फास आवळला; ११ आरोपींना न्यायालयीन कोठडी तर १४ आरोपी यापुर्वीच येरवडा कारागृहात

मंचर (प्रतिनिधी): दूधात भेसळ करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या टोळीविरुद्ध मंचर पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईला…

8 तास ago

शिरुर बायपासवर बेकायदेशीर रस्ता दुभाजक तोडल्याने चार वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा बळी

शिरुर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील शिरुर बायपास येथे संग्राम हॉटेलसमोर मंगळवार (दि ११) झालेल्या चार…

8 तास ago

आयुर्वेदिक औषध कंपन्यांवर FDAचा हातोडा; 10 संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

मुंबई : राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या मनमानी कारभाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी…

9 तास ago