बीड: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा उजवा हात होता. त्यामुळेच धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरही अनेक आरोप धनंजय मुंडेंवर होत आहेत. त्यामुळे ते मागच्या काही दिवसांपासून शेरोशायरीमधून व्यक्त होताना दिसून येत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, माझी वंजारी जात, माझा बीड जिल्हा काही लोकांनी बदनाम केला.
धनंजय मुंडे रविवारी ठाण्यात वंजारी समाजाच्या मेळाव्याला हजर होते. तेव्हाही त्यांचा तोच सूर होता. त्यांच्या शेरोशायरीला बीड येथील वंचित बहुजन आघाडीचे माजी पदाधिकारी आणि वंजारा समाजाचे नेते शिवराज बांगर यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. ‘तू गलत भी है.. तू कातिल भी है’ अशी शायरी त्यांनी सादर केली.
शिवराज बांगर यांची शायरी
तू गलत भी हैं, तू कातिल भी हैं
वाल्मिक की हर गुनाह में तू शामिल हैं
आज तुझे मील रही है क्लिन चीट
किस्मतवाला हैं तू आज सरकार तेरी हैं
सब्र कर मेरे दोस्त कल बारी हमारी हैं
मंत्रिपद गेल्याच्या नैराश्येतून धनंजय मुंडेंनी कालचं भाषण केलं. महादेव मुंडेंना न्याय देण्याच्या बाबतीत त्यांनी एकही शब्द काढली नाही. बापू आंधळेंची हत्या ही कुणी केली, हे धनंजय मुंडेंनी भगवानबाबांच्या समाधीवर हात ठेऊन सांगाव, अस आवाहन शिवराज बांगर यांनी केलं. ते सोमवारी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
धनंजय मुंडेंमुळे वंजारी जात बदनाम झाली
धनंजय मुंडे साहेब तुमच्यामुळे वंजारी जात बदनाम झाली. तुम्ही, वाल्मिक कराड आणि तुमच्या पाच टक्के लाभार्थ्यांमुळे वंजारी समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. माझी जात खून करत नाही, खंडण्या घेत नाही.. हे लक्षात ठेवा. त्यामुळे जातीच्या आडून दडून बसणं बंद करा.
कोण वाल्मिक, त्याची औकात काय?
शिवराज बांगर म्हणाले की, वाल्मिक हा कोणय? त्याची औकात काय? तो गुन्हेगार आहे? पण त्याच्यामागे जी शक्ती आहे ती धनंजय मुंडेंची आहे. धनंजय मुंडेंना हात झटकून चालणार नाही. वाल्मिकने जे केलं, ते धनंजय मुंडेंसाठी! आता एकट्या वाल्मिकवर ब्लेम टाकून चालणार नाही. शिवाय संतोष देशमुख खून प्रकरणात ४० कॉल हे धनंजय मुंडेंचे आरोपींसोबत झालेले आहेत. पूर्ण तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंना क्लिनचीट मिळणार नाही. सरकार तुमचं नसतं तर ९ नंबरचा आरोपी तुम्ही असते, असा घणाघात बांगर यांनी केला.
सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…
'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…
मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…
नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…
ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…
भंडारा: सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ला आज भंडारा येथून उत्साहात प्रारंभ…