वेरूळ : बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी निघालेल्या कर्नाटकातील एका भाविक महिलेचा घृष्णेश्वर मंदिर परिसरात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळे यात्रेतील भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.
मोरम्मा मलकाजप्पा पट्टन शेट्टी (वय ५८) असे मृत महिलेचे नाव असून त्या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हा येथील रहिवासी होत्या. त्या आपल्या कुटुंबीयांसह आणि २७ जणांच्या समूहासोबत ११ फेब्रुवारी रोजी इंडी तालुक्यातून ज्योतिर्लिंग यात्रेसाठी रवाना झाल्या होत्या.
यात्रेदरम्यान त्यांनी औंढा नागनाथ मंदिर, परळी वैजनाथ मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, महाकालेश्वर मंदिर, ओंकारेश्वर मंदिर आणि घृष्णेश्वर अशा सहा ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केले होते. उर्वरित सहा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी त्या पुढे जाणार होत्या.
दरम्यान, शनिवारी रात्री घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन त्या मंदिर परिसरातील पार्किंगकडे परतत असताना त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि त्या जागीच कोसळल्या. सोबत असलेल्या भाविकांनी त्यांना तातडीने खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. रविवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
मृत महिलेचा मुलगा भारतीय सैन्यात कर्नल पदावर श्रीनगर येथे कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. यात्रेतील सर्व भाविक कर्नाटकचे असल्याने भाषेची अडचण निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब फुलारे यांनी पुढाकार घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत केली.
या घटनेनंतर उर्वरित २६ भाविकांनी आपली यात्रा अर्धवट सोडून कर्नाटकला परतण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद खुलताबाद पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…