महाराष्ट्र

महाविकास आघाडीत राज्यसभा जागेवरून रस्सीखेच; ठाकरेंकडून महिला नेत्याला संधीचे संकेत

मुंबई: मार्च महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (MVA) एकाच जागेवरून चुरस निर्माण झाली आहे. या जागेवर आपला दावा असल्याचे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाकडे सर्वाधिक 20 आमदार असल्याचा दावा करत ही जागा शिवसेनेकडेच यावी, अशी भूमिका मांडली जात आहे.

दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देखील या जागेसाठी आग्रही असून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांना दुय्यम स्थान देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महिला नेत्याला संधी?

ही जागा शिवसेनेकडे आली तर महिला नेत्याला उमेदवारी देण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. आदित्य ठाकरे यांनी संसदेत संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी यांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख करत या दोन्ही जागा पुन्हा शिवसेनेकडेच राहाव्यात, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

राज्यसभेतील प्रियांका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपला असून त्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जुन्या फळीमध्ये नाराजीची शक्यता

याआधी या जागेसाठी चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, राजन विचारे आणि सुभाष देसाई यांच्या नावांची चर्चा होती. मात्र महिला उमेदवारीचे संकेत मिळाल्याने या ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

काँग्रेसचा पर्याय काय?

दरम्यान, विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना विधान परिषदेची जागा देऊन राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडावी, असा प्रस्ताव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मांडणार असल्याची माहिती आहे. सपकाळ यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना याबाबत संकेत दिले.

अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

महाविकास आघाडीत ही जागा नेमकी कोणाला मिळणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, जागावाटपावरून आघाडीत अंतर्गत चर्चा आणि राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी काही दिवसांत या विषयावर स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

9 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

10 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

10 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

15 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

16 तास ago