मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, डॉ. झिशान हुसेन, इरफान पठाण ,नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड आदी उपस्थित होते.
निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे परंतु निवडणूक आयोगाचा सध्याचा कारभार पहात त्यांच्यावरचा विश्वास डळमळीत झाला आहे. मतचोरीसाठी सत्ताधारी पक्षाला मदत करून लोकशाहीवर घाला घातल्याचा प्रकार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी उघड केला आहे. निवडणूकीत गैरप्रकार होत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातही निवडणुकीत गडबड झाल्याचे समोर आले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, या निवडणूकीत vvpat वापरणार नाही अशी भूमिका निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे परंतु निवडणुकीतील गैरप्रकार पहाता vvpat वापरावे अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…