महाराष्ट्र

ढगफुटीसदृश्य पाऊस! महानगरपालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

मुंबई: मुंबईत मागील ६ तासांत २०० मिलामीटर आणि २४ तासांत ३५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले असून पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेचे ५२५ पंप कार्यान्वित आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप वाढवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी मुंबई महापालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देऊन शहर आणि उपनगरातील पावसाचा आढावा घेतला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिठी नदीची पाहणी केली तसेच कुर्ला येथील क्रांतीनगर व विक्रोळी पार्कसाईट येथील दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मिठी नदीची पाण्याची पातळी ३.९ मीटरपर्यंत वाढली आहे, त्यामुळे कुर्ल्याच्या क्रांतीनगरमध्ये पाणी शिरले. येथील जवळपास ३५० लोकांना महापालिकेने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. या ठिकाणी रहिवाशांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईत ६ मुख्य पंपिंग स्टेशन्स आणि १० मिनी पंपिंग स्टेशन्स आणि ५२५ पंप कार्यरत आहेत. ६ तासांत २०० मिलामीटर आणि २४ तासांत ३५० मिलीमीटर पाऊस झाला. कमी वेळात जास्त पाऊस म्हणजे ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने मुंबईतील सखल भागात पाणी साचले. सगळीकडे यंत्रणा सज्ज असून पालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहेत, असे ते म्हणाले. घाटकोपर, मुंब्रा आणि विक्रोळी पार्कसाईट येथे जिओ नेटिंगचे काम करण्यात आले आहे. दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे कायम स्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता शहर आणि उपनगरातील पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवावी लागले. यासाठी महापालिका नियोजन करत आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा बंद असली तर बेस्टकडून प्रवाशांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यभरातील पावसाचा आढावा घेतला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात अश्रू…; अजितदादांच्या जयंतीनिमित्त एकनाथ शिंदेंची भावनिक आदरांजली

दादांची स्वप्ने पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली"; फडणवीसांच्या वाढदिवशी शिंदेंच्या भावना अनावर मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री…

8 मिनिटे ago

देवेंद्र! बस नाम ही काफी है; मुख्यमंत्री फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा

'महाराष्ट्राच्या राजकारणातील बिग डी' म्हणत फडणवीसांच्या नेतृत्व, बुद्धिमत्ता आणि विकासदृष्टीचे शिंदेंकडून भरभरून कौतुक मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र…

20 मिनिटे ago

रांजणगाव MIDC पोलिसांनी दुचाकी चोराला धाराशिवमधून केली अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील महागणपती पार्किंगमधून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा छडा लावत…

25 मिनिटे ago

शिक्षकांच्या सूचनांवरच घडणार शिक्षणातील बदल; ‘शिक्षण संवाद २०२६’मध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही

मुंबई : राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांच्या प्रत्यक्ष अनुभवांना व…

28 मिनिटे ago

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जविरोधात काँग्रेसचा भाजपावर मोर्चा; राहुल गांधींना दिलेल्या वागणुकीचा निषेध

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी; परीक्षांतील अनियमिततेवर संसदेत चर्चा आणि विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्याची मागणी मुंबई:…

33 मिनिटे ago

झुरळ विचारांची पुरळ नव्हे, विकासाचा मार्ग निवडूया

मुंबई: भारतभूमी ही केवळ भौगोलिक सीमा नसून हजारो वर्षांची संस्कृती, ज्ञान, परंपरा, संघर्ष आणि सामर्थ्याची…

39 मिनिटे ago