संभाजीनगर: आरटीओ कार्यालयांची इंटरसेप्टर वाहने अधिक सक्षम होणार आहेत कारण त्यांच्यावर रडार प्रणाली बसवली जात आहे.
रडार प्रणाली म्हणजे काय
रडार म्हणजे अशी प्रणाली जी वाहनाचा वेग, हालचाल आणि नियमभंग दूरूनच ओळखते. यात हाय-टेक कॅमेरे सेन्सर्स आणि सॉफ्टवेअर वापरले जातात. त्यामुळे वाहन थांबवण्याची आवश्यकता नसते.
रडार प्रणाली कशी काम करेल
1) रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाचा फोटो काढला जाईल.
2) वाहनाचा वेग मोजला जाईल
3) चालकाने सीट बेल्ट लावला आहे का हेल्मेट घातले आहे काहे तपासले जाईल.
4) वाहन धोकादायक पद्धतीने चालवले जात आहे का, याची पडताळणी होईल.
5) हे सर्व डेटा रडार प्रणालीकडून काही सेकंदांत प्रोसेस होऊन, ई-चालान वाहनधारकाला पाठवले जाईल.
५०० मीटर अंतरापर्यंत नियंत्रण
रडार प्रणाली ५०० मीटर अंतरापर्यंतच्या वाहनाची नोंद घेऊ शकते.
म्हणजेच वाहन किती दूरवरून येत आहे, त्याचा वेग किती आहे, नियमभंग झाला आहे का, हे लगेच टिपले जाईल.
जुन्या पद्धतीत व नवीन रडार प्रणालीतील फरक
सध्या स्पीड गनने तासाला फक्त १५ ते २० चालान तयार होतात.
पण रडार प्रणालीमुळे तासाला तब्बल ७०० ते ८०० चालान करता येणार आहेत.
दिवसासोबतच रात्रीसुद्धा स्पष्ट फोटो मिळणार.
कुठे बसवली जाणार
मुंबई आणि पुण्यानंतर आता *छत्रपती संभाजीनगर* मध्येही काम सुरू झाले आहे.
मराठवाड्यातील एकूण १७ आरटीओ वाहनांवर हे उपकरण बसवले जाणार आहे.
एका वाहनाला बसवण्यासाठी फक्त ६ तास लागतात.
वाहनधारकांनो लक्षात ठेवा.
वाहतूक नियम तोडल्यास सुटणे आता अशक्त बेल्ट आणि हेल्मेट बंधनकारक!
वेगमर्यादा ओलांडली तर लगेच ई-चालान!
धोकादायक ड्रायव्हिंगवर लगेच कारवाई!
एकंदरीत म्हणजे काय तर* छ. संभाजीनगरसह संपूर्ण राज्यभर राबवली जाणारी ही रडार प्रणाली वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी मोठी क्रांती ठरणार आहे.
मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…
पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…
पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…
शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…
बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…
अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…