न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे गावात पैशांच्या वादातून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर दगडफेक करुन गंभीर दुखापत करण्यात आली. या हल्ल्यात पीडिताच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटून हरवल्याची धक्कादायक घटना असुन याबाबत संदेश लहु शेलार (वय ४०, रा. करंजावणे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदेश शेलार यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असुन करडे येथील आर.एम.सी. प्लॅन्टचे भागीदार पवन दिलीप घुले यांच्याकडे त्यांचा पैशाचा व्यवहार बाकी होता. त्यामुळे शेलार यांनी घुले यांना पैसे मागण्यासाठी फोन केला असता, “तुला पैसे अर्जुन काळेकडून घ्यायचे आहेत, प्लॅन्टवर आलास तर जीव मारुन टाकीन,” अशी धमकी शेलार यांना घुलेने दिली.
यानंतर अर्जुन काळे यांनी शेलार यांना प्लॅन्टवर बोलावले. शेलार हे त्यांचे मित्र स्वप्नील शिंदे व निलेश फुंडेसोबत स्वतःच्या गाडीने (एम एच १२ यु एफ ९६१३) आर.एम.सी. प्लॅन्टजवळ गेले. त्या वेळी अनोळखी चार इसमांनी अचानक शेलार यांच्या गाडीवर दगडफेक करुन गाडीच्या काचा फोडल्या.
दरम्यान, आरोपी पवन घुले याने गाडीच्या डाव्या बाजूच्या काचेवर दगड फेकला. तो दगड थेट शेलार यांच्या डोळ्याजवळ आदळून ते गंभीर जखमी झाले. त्याचवेळी शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. यात शेलार यांचा शर्ट फाटला आणि गळ्यातील चार तोळ्यांचे सोन्याची चैन तुटून हरवली.
या प्रकरणी पवन दिलीप घुले (रा. करडे, ता. शिरुर, जि. पुणे) तसेच अन्य चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर ह करत आहेत.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…