महाराष्ट्र

Video: भला मोठा लांब किंग कोब्रा आणि अजगराची झुंज…

नवी दिल्ली : दोन धोकादायक सापांमधील भांडणाचा एक भयानक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक अजगर साप किंग कोब्रा सापाला घट्ट पकडून बसतो, हे दाखवण्यात आले आहे. तो कोब्राला अगदी घट्ट आवळून ठेवतो. त्याचवेळी किंग कोब्राही अजगर सापावर हल्ला करतो. तो अजगराला आपल्या जबड्यात दाबण्याचा प्रयत्न करतो.

हा व्हिडिओ @snake__videos नावाच्या युजरने ‘Instagram’ या सोशल मीडिया साइटवर शेअर केला आहे. व्हिडिओमधील किंग कोब्राची लांबी पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. संबंधित व्हिडिओ अनेकांनी शेअरही केला आहे. व्हिडिओला मिळणाऱ्या लाईक्स, व्ह्यूज आणि शेअरची संख्या सातत्याने वाढत आहे.

अजगर आणि किंग कोब्रा यांच्यात जोरदार झुंज सुरू असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अजगर सापाने किंग कोब्राच्या गळ्याभोवती घट्ट गुंडाळलेले दिसते. मात्र, किंग कोब्राने सुद्धा अजगराचे शरीर जबड्यात धरले आहे. यादरम्यान दोन्ही साप एकमेकांशी भांडताना दिसतात. व्हिडिओ धडकी भरवणारा असून, @snake__videos ने ‘अजगराने किंग कोब्राचा गळा घोटला’ या शीर्षकासह शेअर करण्यात आला आहे.

नेटिझन्सनी व्हिडिओवर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली की, ‘किंग कोब्राचा अजगराने गळा दाबल्याने मृत्यू झाला असेल किंवा मग किंग कोब्राच्या विषामुळे अजगराचा मृत्यू झाला असेल. एका युजरने लिहिले की, ‘याने मला माझ्या आधीच्या पत्नीची आठवण करून दिली.’ एका इंस्टाग्राम युजरने आश्चर्य व्यक्त करत लिहिले की ‘किंग कोब्राची लांबी पाहा’. एका व्यक्तीने पोस्ट केले की, ‘मला वाटतं की लढाईच्या शेवटी दोन्ही सापांचा मृत्यू झाला असावा.’

Video: टाकीचा नळ तुटला अन् युवकाने केला भन्नाट जुगाड…

Video: एटीएम कार्ड नसले तरी काढता येणार पैसे; कसे ते पाहा…

Video: फणा काढलेल्या कोब्रासोबत गाईने काय केले पाहा…

Video! किंग कोब्राने घेतला लगेचच बदला…

Video: नवा खिलारी बैल सापडला मगरींच्या तावडीत; चार तास थरार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

12 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

13 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

13 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

13 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

13 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

13 तास ago