महाराष्ट्र

Video! आजी-आजोबाच्या प्रेमाची इनसाईड स्टोरी; माधुकरी मागून जगतात…

छ. संभाजीनगर : सोनाराच्या दुकानातील आजी-आजोबांचा Video सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आपल्या वयोवृद्ध पत्नीसाठी सोन्याचा दागिना खरेदी करण्याची आजोबांची धडपड पाहून महाराष्ट्र गहिवरला आहे. प्रतिक्रियांच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. संबंधित आजी-आजोबा माधुकरी मागत जीवन जगतात. त्यांचा एक मुलाचे निधन झाले असून, दुसरा मुलाला दारूचे व्यसन आहे.

आजी-आजोबा माधुकरी मागत जीवन जगत असून, आजोबाच्या मनात एक स्वप्न होतं, आपल्या पत्नीसाठी सोन्याची माळ घेण्याचे. आजोबा ‘वनग्राम’च्या सोन्याच्या दुकानात गेल्यानंतर त्यांनी दुकानातून एक छोटीशी माळ आणि मंगळसूत्रातलं डोरले घेतले. दुसरीकडे सोनाराच्या माणुसकीचे दर्शन घडले. दुकानमालकाने सांगितले की, आजोबांची (वय ९३) इच्छा होती की आजीसाठी काहीतरी घ्यावे. पण मी कामानिमित्त बाहेर गेल्याने ते आजी-आजोबा दुकानातून बाहेर गेले. मग, आमच्या तिथल्याच दुसऱ्या शॉपमध्ये ते आले होते, तिथे त्यांनी तोपर्यंत एक दागिना खरेदी केला होता आणि मंगळसुत्राची एक वाटीही घेतली होती. आजोबांनी मला अगोदर 1100 रुपये दिले. कमी पडले का म्हणत पुन्हा आपल्या पिशवीतून मोठी चिल्लर काढली. पण, मी ती नको म्हटल्यावर आजीने पुन्हा 10-20 रुपयांच्या नोटा काढल्या. मात्र, मी आजी आणि आजोबांकडचे पैसे त्यांना परत दिले. त्यानंतर, मंगळसुत्राची वाटी आजोबांच्या हाताने आजीला द्यायला लावली आणि त्यांचा आशीर्वाद म्हणून केवळ 20 रुपये त्यांच्याकडून घेतले. तसेच, प्रेम काय असतं हे आजोबांनी शिकवून दिले, तो क्षण मला कधीच विसरता येणार नाही. त्यांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो, कितीही छोटं असेल तो दागिना, पण त्यामागचं प्रेम सारं सांगून जाणार होते. त्या आजी-आजोबांकडून मिळालेले 20 रुपये मी माझ्या गल्ल्यात ठेवले आहेत, जिथं मी मला मिळणाऱ्या काही गोष्टी ठेवतो.’

आजोबा म्हणाले, ‘माझं वय 93 आणि हिचं वय 70 आहे. त्यांना त्यांच्या मुलाची आठवण झाली अन् त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कारण, त्यांचा तो मुलगा वारला होता. तर, दुसरा मुलगा दारु पीत असतो. म्हणून, त्यांनी रागारागाने घर सोडलं होते, अशी माहितीही दुकान मालकाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितली.

आजोबांचं प्रेम, आजींची स्वप्नपूर्ती अन् मनाचा मोठेपणा; Video तुफान व्हायरल…

Video; पुणे-नगर रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले अन फॉर्च्यूनर घुसली थेट गाळ्यात…

Video: जि.प. शाळा चर्चेत! इयत्ता १तील विद्यार्थी म्हणतात 26 पर्यंत पाढे…

Video: हेल्मेटमध्ये लपलेला कोब्रा चावला दुचाकी चालकाला…

Video: विद्यार्थी एसटीमध्ये खिडकीतून चढायला गेला अन् पुढे पाहाच…

Video: हा माणूस जुगाडचा बाप ठरला….

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन

शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…

13 तास ago

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

18 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

20 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

21 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

1 दिवस ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

1 दिवस ago