आरोग्य

उशिरा उठणं आणि नाश्ता न करणं आरोग्यासाठी धोकादायक, जाणून घ्या…

सकाळच्या सवयी आपल्या दिवसाची सुरुवात ठरवतात. जर आपण सकाळी उठल्याबरोबर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.

सकाळी उठल्यानंतर आपण चांगल्या सवयी अंगीकारणं आणि दिवसाच्या सुरुवातीला कोणतंही नकारात्मक काम करू नये हे खूप महत्वाचं आहे.

उशिरा उठण: उशिरा उठल्याने तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होऊ शकतो. जेव्हा तुम्ही उशिरा उठता तेव्हा तुम्हाला तुमचं काम पूर्ण करण्यात अडचण येऊ शकते. तुम्हाला ताण येऊ शकतो आणि तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. म्हणून सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न करा.

फोनचा अतिवापर: जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरायला सुरुवात केली तर त्यामुळे तुमच्या डोळ्यांना आणि मेंदूला हानी पोहोचवते. तसेच डोकेदुखी, डोळे दुखणे आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मोबाईलचा जास्त वापर केल्यानेही झोपेचा अभाव होऊ शकतो. सकाळी मोबाईल फोनचा वापर कमीत कमी करा आणि तुमचा दिवस चांगला सुरू करा.

नाश्ता न करण: सकाळी नाश्ता न केल्याने तुमच्या शरीरात आवश्यक पोषक तत्वांचा अभाव होतो. यामुळे ऊर्जेचा अभाव आणि थकवा येऊ शकतो. मधुमेह आणि हृदयरोगासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणून सकाळी नाश्ता आवर्जून करावा.

व्यायाम न करण: प्रत्येक व्यक्तीने सकाळी व्यायाम केला पाहिजे. यामुळे तुम्ही लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोग यासारख्या समस्या टाळू शकता. व्यायाम न केल्याने तुम्हाला ताण आणि थकवा देखील जाणवतो, ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. सकाळी व्यायाम करा आणि तुमचे शरीर निरोगी ठेवा.

नियोजन नाही: तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्याकडे प्रत्येक दिवसाची योजना असली पाहिजे. असं केल्याने तुमचा मूड फ्रेश राहतो आणि तुम्हाला दिवसभर हलकं वाटतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago