मुंबई: राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी पक्षातील सर्व मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी करण्याचे स्पष्ट आणि सक्त निर्देश दिले आहेत.
राज्यातील विविध भागांत पावसाअभावी शेतीपिकांवर संकट निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी केवळ कार्यालयीन पातळीवरून आढावा न घेता थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी केल्या आहेत.
“नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना एकटे सोडू नका. त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घ्या, नुकसानग्रस्त भागांची पाहणी करा आणि आवश्यक प्रशासकीय मदत मिळवून देण्यासाठी तत्परतेने पाठपुरावा करा,” असे त्यांनी सांगितले.
शेतकरी संकटात असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या ऐकाव्यात, त्यांना धीर द्यावा आणि शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रत्येक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ता हा शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या सोबत आहे, हा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यासोबतच प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
१९ जिल्ह्यांतील पीक, चारा आणि पाणीस्थिती चिंताजनक; परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शिबीर घेण्याची भूमिका मुंबई : राज्यातील…
मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री…
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत नवीन १,७५६ रुग्णवाहिका शासकीय सेवेत दाखल होणार…
१००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर आयोजन; युवा विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यावर भर मुंबई: १००व्या…
‘शेतकऱ्यांच्या ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन कुठे गेले?’ मुंबई: राज्यात गंभीर कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून…
ठाणे: ठाण्यातील क्लस्टर पुनर्विकास हा केवळ जुन्या घरांच्या जागी नवीन इमारती उभारण्याचा प्रकल्प नसून, हजारो…