व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा

मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्होटचोरी करून भाजपाला निवडणूका जिंकून देण्यात मदत केली आहे हे आता स्पष्ट झाले आहे. देशभरात व्होटचोर ज्ञानेशकुमार आणि त्याचे आका मोदी शाह यांच्याविरोधात देशभरात प्रचंड संताप आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपले उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड मधील कार्यक्रम रद्द केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली ३०० खासदार त्यांना भेटायला गेले ते त्यांना भेटत नाहीत. या व्होटचोर ज्ञानेशकुमारला काँग्रेस कार्यकर्ते महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाहीत आला तर त्याच्या तोंडाला काळे फासणार असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, व्होटचोर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार संविधानिक पदावर बसून भाजपच्या एजंटप्रमाणे वागत आहेत. त्यांनी देशातील लोकशाहीची हत्या केली असून या देशद्रोहीविरोधात देशभरात प्रचंड संताप आहे. संपूर्ण देश रस्त्यावर उतरून ज्ञानेश कुमारच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यामुळे त्यांच्या नियोजित दौऱ्यांमध्ये सातत्याने बदल होत असून मेरठ, वाराणसीनंतर आता ७ व ८ ऑक्टोबर रोजीचा छत्तीसगड दौराही स्थगित करण्यात आला आहे. फॉर्म ६ मध्ये बेकायदा बदल करून १८ वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे. या पापाची शिक्षा ज्ञानेशकुमार आणि संरक्षण देणा-या आकांना भोगावीच लागणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल जी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मतदारांच्या हक्कांसाठी आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी संघर्ष करत राहील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

20 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

20 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

1 दिवस ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

1 दिवस ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

1 दिवस ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

1 दिवस ago