महाराष्ट्र

आमच्याकडे विलिनीकरणाबाबत प्रस्तावच नाही किंवा कशातच काही नाही…

आज त्या गोष्टीची चर्चा आमच्या स्तरावर अस्तित्वात नाही. त्याबद्दल भाष्य करण्यात काय अर्थ; सुनिल तटकरे

मुंबई: राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत कुठलाही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेला नाही आणि आमच्या विचारार्थही नाही. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएमध्येच राहणार आहोत या भूमिकेशी ज्यांना समरस व्हायचे असेल किंवा या भूमिकेबरोबर वाटचाल करायची असेल त्यांचे जरुर पक्षात स्वागत आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा मुद्दाच नाही. आमच्याकडे प्रस्तावच नाही किंवा कशातच नाही आज त्या गोष्टीची चर्चा आमच्या स्तरावर अस्तित्वात नाही. त्याबद्दल भाष्य करण्यात काय अर्थ आहे असे स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांमध्ये चालवल्या जाणाऱ्या बातम्यांवर भूमिका आज पत्रकार परिषदेत मांडली.

ज्या क्षणापर्यंत विलिनीकरणाच्या प्रस्तावाचा साधा विचारही समोर आला नाही. त्याची चर्चाही नाही. त्यामुळे विरोध असणे… अनुकूल असणे… प्रतिकूल असणे… हा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे प्रस्ताव नाही त्यावर आज विलिनीकरणाचा प्रश्नच नाही. आज आम्ही आमच्या मूळ विचारधारेसोबतच एनडीएमध्ये सहभागी आहोत आणि एनडीएमध्ये सहभागी असल्यामुळे आज आमचा पुढचा राजकीय प्रवास त्यांच्यासोबत देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. त्यामुळे त्यात बदल होण्याचे कारण नाही असेही सुनिल तटकरे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

राष्ट्रवादीत २०१४ पासूनच माझ्या वेगवेगळ्या मुलाखतीत बोललो आहे की, आम्ही हा निर्णय घेईपर्यंत भाजपसोबत सरकारमध्ये किंवा सत्तेमध्ये सोबत जायचे याबाबत अनेकवेळा चर्चा झाली होती. अनेक प्रसंग, निर्णय टप्प्यापर्यंत पोचले होते. परंतु त्यावेळी निर्णय होऊ शकला नाही हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज आम्ही घेतलेली भूमिका आणि त्यात विलिनीकरण हे दोन ध्रुवावरील विषय दिसतात. माझा विरोध… प्रफुलभाईंचा विरोध… हा मुद्दा त्यामध्ये नाहीच आहे. मुळ मुद्दा आपल्याला आहे की, असा प्रस्ताव कुठे आहे ही माहिती तुम्ही मला सांगितली तर मी दुर्बिण लावून शोध घेईन असेही सुनिल तटकरे यांनी मिश्कीलपणे माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

पक्षात माझ्या शब्दाला किंमत हा भाग वेगळा आहे. सत्तेमध्ये सहभागी होण्याचा आमचा निर्णय कलेक्टिव होता. अजितदादा, प्रफुलभाई, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे या सर्वांनी घेतला. आमदारांची साथ मिळाली. राज्यातील जनतेची मोठी साथ मिळाली. लोकसभेनंतर आम्ही आपल्या कुणाच्या खिजगणतीत नव्हतो. फक्त पाच – सहा जागा मिळतील असे बोलले जात होते. मात्र परिश्रमपूर्वक मेहनत घेतली. जनसन्मान यात्रा काढली आणि राज्यात वातावरण निर्माण झाले. लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी झाली. अनेक निर्णय झाले आणि पक्ष म्हणून प्रभावीपणाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवली आणि शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारापासून तसूभरही मागे पडलो नाही. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यामुळे जनतेने भरभरून जागा आम्हाला दिल्या हेही सुनिल तटकरे यांनी आवर्जून स्पष्ट केले.

लोकसभेनंतर आम्ही राहतो की नाही असा प्रश्न निर्माण केला जात होता. आता त्या सर्व प्रश्नांची उत्तरे राजकीयदृष्ट्या राज्यातील जनतेने दिली आहेत. त्यामुळे जर – तरच्या मुद्द्यावर मी प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे कुठलेही वक्तव्य करणे चुकीचे ठरेल. एकदा नक्की कळूदे की, प्रश्न विलिनीकरणाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर चर्चेला आला मग पुढच्या बाबी येतील. परंतु जे नाहीच आणि दिसत नाही त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे. त्यामुळे आता सूत्रांच्या बातम्या…किंवा ती सुत्रे आम्हाला शोधावी लागतील असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर हसतच सुनिल तटकरे यांनी दिले.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपरी-चिंचवड पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ! ६५ नवीन वाहने, ४ ड्रोन अन् AI CCTV नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…

11 तास ago

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

13 तास ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

13 तास ago

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

18 तास ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

1 दिवस ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

1 दिवस ago