शिरूर तालुका

शिरुर बसस्थानक समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी अभिनव आंदोलन : खड्ड्यात झोपून सामाजिक कार्यकर्त्याचा अनोखा निषेध

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर बसस्थानकातील प्रलंबित समस्या आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी एक अभिनव आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधले. शिरूर बसस्थानकासमोरील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात प्रत्यक्ष झोपून त्यांनी आपल्या आंदोलनाची सुरूवात केली. या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला असून, बसस्थानकाच्या अवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जुन्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.यापूर्वीही प्रितेश फुलडाळे यांनी बसस्थानकाच्या समस्यांबाबत बेमुदत उपोषण केले होते. त्यावेळी पुणे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे, आगार व्यवस्थापक संगीता गायकवाड, स्थानक प्रमुख भैरवनाथ दळवी यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत बैठक घेऊन समस्यांचे निवारण १० दिवसांत करण्यात येईल आणि पुढील महिन्यात शिरुर आगाराला १० नवीन बसेस देण्यात येतील, असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. परंतु त्यानंतरही कोणतीही ठोस कृती न झाल्यामुळे हे आंदोलन पुन्हा छेडण्यात आले.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरुर आगार प्रमुख संगीता गायकवाड, स्थानक प्रमुख भैरवनाथ दळवी यांच्यासह आंदोलकांनी चर्चा केली. यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि पुढीलप्रमाणे आश्वासने देण्यात आली:

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था: सध्या स्वच्छतागृहाच्या शेजारी असलेली पिण्याच्या पाण्याची जागा बदलून नवीन ठिकाणी आरो प्लांट बसवला जाईल. हे काम महिनाभरात पूर्ण केले जाईल.आतील रस्त्याची दुरुस्ती: बसस्थानकातील आतील रस्त्याची दुरुस्ती पुढील दोन महिन्यांत पूर्ण केली जाईल.नवीन बसेस: शिरुर आगाराला लवकरच ५ नवीन बसेस देण्यात येतील.

बस मार्ग बदल: एस.टी. बसेस पुणे; अहिल्यानगर बाह्यमार्गाऐवजी थेट शिरुर बसस्थानकातूनच येतील-जातील याबाबत लवकरच सूचना दिल्या जातील.पोलीस बंदोबस्त: बसस्थानक परिसरात सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू करण्यात येईल.

खाजगी वाहन पार्किंगवर कारवाई: स्थानकात होणाऱ्या खाजगी वाहन पार्किंगवर नियंत्रण ठेवण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत.

कचरा व्यवस्थापन: बसस्थानकातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली जाईल.

पाण्याच्या बाटल्यांचे दर फलक: “नाथजल” पाण्याच्या बाटल्यांचे दर (₹१५) स्पष्ट करणारा फलक लावण्यात येईल.

प्रवेशद्वाराजवळ लाईट बसवणे: गार्डनजवळ लाईट बसवण्याचे काम करण्यात येईल.

CNG पंप कामाची माहिती: आगारातील CNG पंपाच्या प्रगतीची माहिती देण्यात येईल.

ग्रामीण बसेससाठी स्वतंत्र फलाट: ग्रामीण भागात जाणाऱ्या एस.टी. बसेससाठी स्वतंत्र फलाट असावा, अशी मागणी मान्य करण्यात आली.

या आंदोलनात प्रितेश फुलडाळे यांच्यासह विविध पक्षांचे व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये प्रवासी संघटनेचे अनिल बांडे, आम आदमी पक्षाचे ॲड. सुभाष जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नोटरी रवींद्र खांडरे, भाजपाच्या प्रिया बिरादार, विजय नरके, राजेंद्र शहाणे, रणदिवे मामा, मनसेच्या डॉ. वैशाली साखरे, अविनाश घोगरे, राजेंद्र महाजन, शंकर चाबुकस्वार, सोहेल शेख, शांतीलाल नहार, बाळासाहेब तातेड, अशोक गुळादे, बाळासाहेब आवारी, आधार छाया प्रतिष्ठानच्या सविता बोरुडे, कोमल भणगे, हीना शेख, प्रीती बनसोडे, कडेकर आदींचा समावेश होता.

या आंदोलनामुळे प्रशासनाला जाग आली असून काही महत्त्वाच्या कामांना चालना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, हे आश्वासन किती प्रभावीपणे अंमलात आणले जाते, हे येणारा काळच ठरवेल. शिरुरकर नागरिकांना आता केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी पाहिजे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

59 मिनिटे ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

4 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

6 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago