महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात मुंबई क्राइम ब्रांचला काय सापडल; गृहमंत्रालयाने खुलासा करावा

पोलिसांनी कोणाला अटक केली, हे आरोपी, सावरी गावातील तेजस लॉज व ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांचा काय संबंध…

मुंबई: सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात मुंबई क्राइम ब्रांचने छापा टाकला आहे. पण या कारवाई बाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. या कारवाईत नेमके काय सापडले? असा प्रश्न विचारून गृहमंत्रालयाने यावर खुलासा करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेने ९ डिसेंबरला दोन अंमली पदार्थांच्या तस्करांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ते मेफेड्रॉन पुण्यातील विशाल मोरे या व्यक्तीकडुन आणल्याचे सांगितले. मुंबई पोलीसांनी विशाल मोरेला पकडण्यासाठी सापळा रचला. मेफेड्रोन खरेदी करायचे आहे असे सांगुन १२ डिसेंबरला विशाल मोरेला पिंपरी चिंचवडच्या हद्दीत दोन किलो मेफेड्रोनसह पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात तो मेफेड्रोन तयार करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलीसांनी सावरी गावात धाड टाकली असता तिथे एका गुरांच्या गोठ्यात शेड उभारुन मेफेड्रोन तयार करणे सुरु होते. ती जागा गोविंद शिमकर नावाच्या बामणोलीत व्यक्तीची असुन ओंकार दिघे या सावरीत राहणा-या व्यक्तीच्या मार्फत मोरेला भाड्याने दिली होती. पोलीसांनी तिथुनच तीन कामगारांना अटक केली, जे पश्चीम बंगालचे आहेत.

सपकाळ पुढे म्हणाले की, सावरी गावातील गोठ्यात मेफेड्रोन तयार करणा-या तीन बंगाली कामगारांना ओंकार दिघे हा गावातील तेजस लॉजमधुन जेवण आणून देत होता. सावरी गावातील हे तेजस लॉज ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे आहे. दिड महिन्यांपुर्वी हे लॉज सुरु झाले असुन प्रकाश शिंदेंनी ते दरे गावातील रणजीत शिंदे याला चालवायला दिले होते. सावरी गावात ज्या जागेवर छापा टाकण्यात आला ती जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे का नातेवाईकांची ? तिथे ड्रग्सची फॅक्टरी सुरु आहे का? बोगस नोटांचा कारखाना ? जादूटोणा सुरु आहे ? की आणखी काही अवैध धंदे ? मुंबई क्राइम ब्रांच आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे का पोहोचले? सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकही तातडीने तिथे पोहचले. त्यांना तिथे काय आढळून आले ? या संपूर्ण प्रकरणाची माहिती दडवून सरकार नेमके काय झाकण्याचा प्रयत्न करत आहे ? या प्रकरणी संशय बळावत असून गृह विभागाने खुलासा करावा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

1 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

2 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

2 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

2 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

2 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

2 दिवस ago