आरोग्य

दूध न पिताही हाडे होतील मजबूत, कॅल्शियमची पॉवर असलेले हे 7 पदार्थ आजपासूनच खा

थंडीत हाडे किंवा सांध्यात तीव्र वेदना होत असतात. केवळ साठीला आलेले लोक नव्हे तर हल्ली तरुणांमध्ये देखील सांधेदुखी दिसत आहे. ज्याचे सर्वात मोठे कारण कॅल्शियमची कमतरता हे आहे. लोक बॉडी बनवण्यासाठी प्रोटीन तर घेत असतात. परंतू कॅल्शियमकडे त्यांचे साफ दुर्लक्ष असते. आरामदायी जीवनशैलीने सकाळचे कोवळे ऊन्हात फिरणे होत नसल्याने डी जीवनसत्वाची देखील शरीरात कमतरता होते.त्यामुळे कमी वयात हाडे ठीसूळ होतात. ज्यांना दूध आणि दूधाचे पदार्थ वर्ज्य आहेत. त्यांच्या कॅल्शियम असलेले 7 पदार्थ वरदान ठरतील.

तीळ

तिळाला थंडीत सूपरफूड मानले जाते, तिळात सहा पट जास्त कॅल्शियम आढळते. १०० ग्रॅम तिळात सुमारे ९७५ ग्रॅम कॅल्शियम आढळते. तुम्ही तिळाचे लाडू, चटणी, सलाडमध्ये मिक्स करुन खाऊ शकता. थंडीत नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. तिळ दिसायला जरी छोटे असले तरी यांना कॅल्शियमचा सुपरफूड म्हटले जाते.

हिरव्या पालेभाज्या

थंडीत मिळणाऱ्या हिरव्या पालेभाज्या कॅल्शियमने पूरेपूर असतात. पालक, मेथी आणि बुटुव्याच्या भाजीत कॅल्शियम आणि व्हीटामिन्स K असते. जे हाडांना मजबूत करते आणि याच्या नियमित सेवनाने सांधेदुखी देखील कमी होते.

राजमा आणि चणे

अनेक लोकांना माहिती नाही राजमा आणि चण्यात देखील कॅल्शियम अधिक असते. १ कप उकडलेल्या चण्यात ८० ते १०० ग्रॅम कॅल्शियम मिळते. तसेच हे प्रोटीन, फायबर आणि आयर्न देखील देते. सर्दीत चणे – राजमा गरमागरम डीश हाडांसाठी वरदानाहून कमी नाहीत.

अंजीर

सुख्या अंजीरात कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे हाडे मजबूत रहातात. रोज ४ ते ५ सुखे अंजीर खाल्ल्याने शरीराची कॅल्शियमची गरज सहज पूर्ण होते.अंजीर बद्धकोष्ठतेची समस्याही कमी करते. आणि रक्त वाढवण्यास मदत करते. याशिवाय याच्या नियमित सेवनाने आरोग्याला लाभ होतो.

सोया आणि सोया प्रोडक्ट्स

पनीर आणि दूधाशिवाय देखील शरीराला कॅल्शियम मिळू शकते. केवळ तुमच्या डाएटमध्ये सोयाबिन, टोफू आणि सोया मिल्कचा समावेश करा. सोयाबिन देखील कॅल्शियममध्ये खूप असते. १०० ग्रॅम टोफूत सुमारे ३५० ग्रॅम कॅल्शियम असते. हे खास करुन त्या लोकांसाठी चांगले असते जे दूध पिऊ इच्छीत नाहीत वा लॅक्टोज इंटॉलरेंट आहेत.

बदाम

ड्रायफ्रूटमध्ये काजू आणि अक्रोडच्या शिवाय बदाम देखील लोकांना आवडतात. परंतू अनेकांना माहिती नाही की बदामाने शरीरातील कॅल्शियमची करतरता पूर्ण केली जाते. बदाम मेंदूसह हाडांसाठी देखील चांगला आहे.१०० ग्रॅम बदामात २६० mg कॅल्शियम आढळते. थंडीत रोज ५ ते ७ बदाम भिजवून खाल्ल्याने खूप फायदा होतो.

नाचणी

रागी किंवा नाचणीत जास्त कॅल्शियम आढळते. १०० ग्रॅम रागीत तीन ग्लास दूधाची ताकद असते. कारण केवळ १०० ग्रॅम रागीत ( नाचणी ) शरीराला ३५० ग्रॅम कॅल्शियम मिळते. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांसाठी नाचणी खूपच फायदेशीर असते. नाचणीला भाकरी, डोसा, खीर वा दलिया रुपात खाता येते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

11 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago