महाराष्ट्र

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंब्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या खासदारांना पत्र पाठवणार; न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी

उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डींनी घेतली काँग्रेस खासदारांची भेट

मुंबई: उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती हे पद सअत्यंत महत्वाचे असून विविध भाषा, जात, धर्म व पंथाचे प्रतिबिंब राज्यसभेत दिसले पाहिजे. देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तर राज्यघटनेचे संरक्षण करेन, असा विश्वास उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी व्यक्त केला आहे.

उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी यांनी आज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे भेट देऊन काँग्रेस खासदारांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, इंडिया आघाडीने मला उमेदवारी दिली असून मला पाठिंबा मिळावा यासाठी मी सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांना वैयक्तीक पत्र पाठवून विनंती करणार आहे. भाजपाच्या खासदारांनी वेळ दिली तर त्यांनाही भेटेन असे रेड्डी यांनी सांगितले. या निवडणुकीत व्हीप नसतो, गुप्त मतदान असते, त्यामुळे माझी उमेदवारी योग्य वाटत असेल तर मला मतदान करावे, अशी सर्वपक्षीय खासदारांनी विनंती करतो, असेही रेड्डी म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, आज देश संकटात असताना लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलेला असून उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही लोकशाहीचा जागर आहे. संविधान रक्षणाचा संकल्प घेऊन बी. सुदर्शन रेड्डी सर्व राजकीय पक्षांना भेटून संवाद साधत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचीही त्यांनी भेट घेतली असून त्यांची सकारात्मक चर्चा झाली आहे. देशातील आजची राजकीय परिस्थिती पाहचा निकाल चमत्कारिक असू शकतात, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमित बी. सुदर्शन रेड्डी यांचे स्वागत आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक अत्यंत महत्वाची असून या निवडणुकीत काहीही होऊ शकते. इंडिया आघाडीकडे बहुमत नसले तरी निवडणुकीत इंडिया आघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकतो, असा विश्वास खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, कोल्हापूरचे खासदार श्री. छत्रपती शाहू महाराज, खासदार डॉ. कल्याण काळे, खा. डॉ.शोभा बच्छाव, राज्यसभा सदस्य डॅा. नासिर हुसेन, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

3 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago