महाराष्ट्र

जालिंदर कामठे यांच्या निधनाने राष्ट्रवादीचा निष्ठावान सहकारी हरपला; सुनेत्रा पवार

पुणे: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान, विश्वासू आणि समर्पित सहकारी हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

शोकसंदेशात सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे की, जालिंदर कामठे यांनी सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा, कार्यनिष्ठा आणि जनसेवेची मूल्ये जपत पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रामीण विकास, लोककल्याण आणि प्रभावी प्रशासनाला प्राधान्य देत उल्लेखनीय कार्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणात त्यांचे मोठे योगदान राहिले. पक्षाच्या विचारांप्रती त्यांची निष्ठा, कार्यकर्त्यांशी असलेला आत्मीय संवाद आणि जनतेच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने पक्षाने एक अनुभवी, निष्ठावान आणि समर्पित कार्यकर्ता गमावला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी सुनेत्रा अजित पवार यांनी जालिंदर कामठे यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत, “या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण कामठे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो,” अशी प्रार्थना केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

7 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

7 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

8 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

8 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

8 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

18 तास ago