महाराष्ट्र

महिला दिनानिमित्त ‘महिला कला महोत्सव २०२६’ ची उत्साहात सांगता

मुंबई: महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला कला महोत्सव २०२६’ या महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. रवींद्र नाट्य मंदिर येथे ५ ते ८ मार्चदरम्यान पार पडलेल्या या महोत्सवातील विविध नाट्य आणि संगीत कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.

महोत्सवात विविध विषयांवर आधारित नाट्य आणि संगीत कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये ‘रखमाबाई सावे राऊत यांची संघर्ष कहाणी (दि हिंदू लेडी)’ या नाटकाने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले. पहिल्या भारतीय महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर रखमाबाई सावे राऊत यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित या नाटकातून त्यांच्या संघर्षमय आयुष्याची कथा प्रभावीपणे उलगडण्यात आली. समाजातील रूढी-परंपरांना धैर्याने सामोरे जात शिक्षण आणि स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यांच्या लढ्याचे प्रभावी चित्रण या नाटकातून पाहायला मिळाले. या नाटकाचे लेखन चेतक घेगडमल यांनी केले असून दिग्दर्शन शिवानी पेडणेकर यांनी केले. कलाकारांच्या प्रभावी अभिनयाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

याशिवाय ‘शब्द रंग सूर संगं’ हा रागदारी बंदिशींवर आधारित सुरेल संगीत कार्यक्रमही सादर करण्यात आला. या कार्यक्रमाची संकल्पना, प्रस्तुती आणि गायन सुप्रसिद्ध गायिका माधवी नानल यांनी केले. विविध विषयांवरील रागदारी बंदिशींचे त्यांनी अत्यंत भावपूर्ण आणि सुरेल सादरीकरण करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात तबल्यावर मुक्ता रस्ते, हार्मोनियमवर भक्ती बडे घैसास, तर व्हायोलिनवर केतकी पोंथे यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. सहगायिका म्हणून नूपुर गाडगीळ, प्रीती तळवलकर, ज्योती शंकर आणि निवेदिता जोशी यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले.

‘स्त्री स्वर गौरव’ या विशेष संगीत कार्यक्रमात स्त्री बंदिशकार आणि गायिकांच्या अमूल्य योगदानाला उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन अनुजा झोकरकर यांनी केले. गायनाची जबाबदारी अनुजा झोकरकर आणि केतकी चैतन्य यांनी समर्थपणे सांभाळली. कार्यक्रमात तबल्यावर मुक्ता रस्ते, पखवाजावर गार्गी शेजवळ, बासरीवर वैष्णवी जोशी, तर हार्मोनियमवर नीला सोहनी यांनी सुंदर साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन अनन्या मोडक यांनी केले.

याचबरोबर ‘आदिम गीतकथा’ या आगळ्यावेगळ्या संगीतप्रधान कार्यक्रमाचे सादरीकरण प्राची माया गजानन यांनी केले. आदिवासी स्त्रियांच्या भावविश्वाचे प्रभावी दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमात त्यांच्या जीवनातील भावना, परंपरा आणि संस्कृतीचे जिवंत चित्रण सादर करण्यात आले.

महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या महोत्सवातील सर्व कार्यक्रमांना प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे या महोत्सवात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला. कलाकार, आयोजक तसेच प्रेक्षक म्हणून महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. नाट्य, संगीत आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या या महोत्सवाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत ‘खड्डेमुक्ती’वर ९० कोटींचा प्रश्नचिन्ह; अनियमिततेच्या आरोपांवरून प्रशासनाला निवेदन

मुंबई: मुंबई महानगरपालिका चे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील कथित अनियमितता व संभाव्य…

1 तास ago

पुण्यातील ILS विधी महाविद्यालय शुल्क वसुली प्रकरणी चौकशी; विद्यार्थ्यांना 6% व्याजासह परतावा

मुंबई: विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय.एल.एस. विधी महाविद्यालयातील बेकायदेशीर शुल्क वसुली प्रकरणी…

1 तास ago

शेतीच्या वादातून चांडोह येथे हाणामारी; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील सालकरमळा परिसरात शेतीच्या नांगरणीवरून दोन गटांमध्ये वाद होऊन…

3 तास ago

पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला; पतीविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): पोटगीच्या वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना…

3 तास ago

महा-ऑनलाईन सर्व्हर ठप्प; विद्यार्थ्यांची गैरसोय वाढली

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य शासनाच्या महत्त्वाच्या महा-ऑनलाईन पोर्टलचा सर्व्हर गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने…

3 तास ago

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

22 तास ago