महाराष्ट्र

ZP, पंचायत समिती निवडणुकांचा मुहूर्त ठरला…

पुणे: राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरला असून, याबाबतची घोषणा दोन दिवसातच होणार असल्याचे म्हटले जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. आधी राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी पार पडली. नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरलाय. याबाबतची घोषणा दोन दिवसातच होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका डिसेंबर महिन्यातच पार पडणार आहेत. तर तिसऱ्या टप्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. येत्या २० ते २५ दिवसांत या निवडणुका होतील, अशी शक्यता आहे.

निवडणुकीची घोषणा लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे. यामुळे पुढच्या महिन्यात होत असलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते २० डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका २० डिसेंबरनंतर होतील, अशी शक्यता होती. पण आता यात बदल करण्यात आला असून, दोन दिवसात निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

नगरपरिषद, नगरपंचायत, ZP नंतर सरपंच निवडणूक; देता येणार २ मते…

निवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला! नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद अन् महापालिका निवडणूक एकत्र

गट व ‘गन’ जाहीर होताच मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू; आखाडात स्नेहभोजन की निवडणूक प्रचार?

बॅलेट पेपरवर मतदानाच्या जनतेच्या मागणीची दखल निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी

Video: कारेगाव गणातून पंचायत समिती लढवणार : पप्पू भोसले

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago