मुख्य बातम्या

रांजणगाव-कारेगाव ZP गटात हजारो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन; तीनही उमेदवारांचे अर्ज दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंगळवार (दि २०) रोजी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली राजकीय ताकत दाखवत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ज्योती मानसिंग पाचुंदकर, निर्मला शुभम नवले आणि महेश फंड या तीनही अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

रांजणगाव गणपती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन रांजणगावच्या महागणती मंदिरात जाऊन उमेदवारांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच इतरही स्थानिक देवस्थानात दर्शन घेण्यात आले. त्यानंतर गावात ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि “राष्ट्रवादीचा विजय असो” या जोरदार घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर ‘राष्ट्रवादीमय’ झाला होता. यावेळी स्थानिक ग्रामस्थांची मोठया प्रमाणात लक्षणीय उपस्थिती होती.

रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला आरक्षण लागू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्योती मानसिंग पाचुंदकर पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. तर रांजणगाव पंचायत समिती गणात खुला वर्ग हे आरक्षण असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून महेश निवृत्ती फंड यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. या पंचायत समिती गणात रांजणगाव गणपती, खंडाळे, पिंपरी दुमाला, कोंढापुरी, गणेगाव खालसा, पिंपळे धुमाळ, बाभुळकर आणि बुरुंजवाडी ही गावे समाविष्ट आहेत.

तसेच कारेगाव पंचायत समिती गणातही खुला वर्ग हे आरक्षण असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्मला शुभम नवले यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. या गणात कारेगाव, निमगाव भोगी, ढोकसांगवी, सोनेसांगवी, वाघाळे, वरुडे, चिंचोली मोराची आणि कान्हूर मेसाई ही गावे येतात.

यावेळी ज्योती पाचुंदकर पाटील, निर्मला नवले आणि महेश फंड यांनी शिरुर तहसीलदार कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज अधिकृतपणे सादर केले. अर्ज दाखल करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक-युवती, महिला कार्यकर्त्या तसेच विविध गावांतील ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी तालुका व जिल्हा स्तरावरील नेते, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत आगामी निवडणूक एकजुटीने आणि ताकदीने लढविण्याचा निर्धार व्यक्त केला.

रांजणगाव-कारेगाव गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला…

मानसिंग पाचुंदकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली रांजणगाव-कारेगाव गटातील प्रचंड जनसमुदाय एकत्र आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची खरी ताकद या गटात किती आहे, हे स्पष्टपणे दिसून आले. या भागात उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, तसेच मानसिंग पाचुंदकर पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले असुन आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

ज्योती मानसिंग पाचुंदकर यांना प्रचारात पतीची खंबीर साथ!

जिल्हा परिषद अपडेट! ज्योती मानसिंग पाचुंदकर यांची प्रचारात जोरदार आघाडी!

रांजणगाव गणपती ZP गट! खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात: मानसिंग पाचुंदकर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार

सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी…

2 तास ago

रात्रीच्या जेवणानंतर इवलिशी वेलची चावून खा! एक नाही अनेक गुणकारी फायदे

रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी…

2 तास ago

SIR वादावर NDAमध्येही मतभेद? कुशवाहांचा निवडणूक आयोगाला सवाल

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू…

2 तास ago

कडा हादरले! गणेश विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला

जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू…

2 तास ago

मीटरवरील ‘हा’ लाल दिवा देतोय मोठा संकेत! वीजबिल वाढण्याआधीच कळू शकते कारण

मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण…

3 तास ago

विखे कुटुंबातील नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत

काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला…

3 तास ago