काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीतील आंदोलनात सहभागी होणार
मुंबई: विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून राज्यात भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांवर दरोडा टाकलेला असून या मतचोरीची चौकशी केली जात नाही. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली असून लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे. म्हणून प्रदेश काँग्रेस उद्या गुरुवार दिनांक १२ जून रोजी राज्यभर मशाल मोर्चे काढून जनजागृती करणार आहे तसेच विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीमधील आंदोलनात सहभागी होत आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील आंदोलनात पक्षाचे नेते सहभागी होतील.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड मोठे यश मिळावे व भाजपा युतीचे पानीपत झाले होते. विधानसभा निवडणुकीत युती १०० जागाही जिंकू शकणार नाही अशी परिस्थिती असताना भाजपा युतीला प्रचंड बहुमताचा निकाल आला तो अनाकलनीय व अविश्वसनीय आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या टक्केवारवरही संशय निर्माण झालेला आहे. मतदान संपल्यानंतर ५८ टक्के जाहीर केलेले मतदार दुसऱ्या दिवशी मात्र ६६.५ टक्के दाखवून तब्बल ७.८३ टक्क्यांची वाढ दाखवली. हा एक मोठा घोटाळा आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष व पारदर्शी निवडणूका घेणे त्यांचे कर्तव्यच आहे पण त्यांच्यावरच संशयाचे ढग जमा होत असतील तर ते लोकशाही साठी घातक आहे. लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी व निवडणूक आयोगावर निर्माण झालेले हे संशयाचे ढग दूर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीतील मॅच फिक्सिंगची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. या आंदोलनात पक्षाचे वरिष्ठ नेते, आजी माजी खासदार, आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…