राजकीय

पंकजा मुंडेंच्या झंझावती नेतृत्वाचा विधानसभा निवडणुकीत करिश्मा

सभा घेतलेल्या २७ उमेदवारांपैकी महायुतीचे २३ उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी

मुंबई: भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा स्टार प्रचारक आ. पंकजाताई मुंडे यांच्या धडाकेबाज नेतृत्वाचा करिश्मा विधानसभा निवडणुकीतही दिसून आला हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. त्यांनी प्रचार सभा घेतलेल्या २७ उमेदवारां पैकी २३ उमेदवार प्रचंड मतांनी झाले तर चार उमेदवारांचा निसटता पराभव झाला. दरम्यान, सर्व विजयी उमेदवारांचे आ. पंकजा मुंडेंनी अभिनंदन केले आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारक असलेल्या आ. पंकजा मुंडे यांनी स्वतःच्या बीड जिल्हयात उमेदवारांसाठी दोन दोन सभा तर घेतल्याच पण त्याच बरोबर राज्यातही ठिक ठिकाणी जोरदार प्रचार करून भाजपा महायुतीच्या उमेदवारांना बळ दिले. केवळ भाजपच्याच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी देखील त्यांनी प्रचार सभा घेतल्या. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पंकजा मुंडे यांच्या खांद्यावर छोटीसी शस्त्रक्रिया झाली, तशा अवस्थेतही त्यांनी दुखणं सहन करत राज्यभर प्रचार केला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा राजकीय वारसा लाभलेल्या आ. पंकजा मुंडे यांच्या कणखर व फायरब्रॅड नेतृत्वाचा करिश्मा आजच्या निकालाने राज्यात पुन्हा एकदा दिसून आला.

सभा घेतलेले २७ पैकी २३ उमेदवार विजयी

आ. पंकजाताई मुंडे यांनी महायुतीच्या विजयासाठी कठोर मेहनत घेत ३५ हून अधिक सभा घेतल्या. काही ठिकाणी एकाहून अधिक सभा घेतल्या. त्यांनी सभा घेतलेल्या २७ मतदारसंघात २३ उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यात भाजपचे १८ व शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादीच्या ४ आमदारांचा समावेश आहे. बीड, मालेगाव वाशिम, सिंदखेडराजा, लोणार या ठिकाणी महायुतीला यश मिळू शकले नाही.

सभा घेतलेल्या जागेवर महायुतीचे विजयी झालेले आमदार पुढीलप्रमाणे

सिध्दार्थ शिरोळे (शिवाजीनगर पुणे), कुमार आयलानी (उल्हासनगर),धनंजय मुंडे (परळी), नमिता मुंदडा (केज), विजयसिंह पंडीत (गेवराई), आकाश फुंडकर (खामगांव), सुरेश धस (आष्टी), मेघना बोर्डीकर (जिंतूर), दिलीप बनकर (निफाड), माधुरी मिसाळ (पुणे), श्रीजया चव्हाण (भोकर), भीमराव केराम (किनवट), तानाजी मुटकुळे (हिंगोली), प्रकाश सोळंके (माजलगांव), प्रताप अडसड (धामणगांव), सुरेश खाडे (मिरज) सीमा हिरे (नाशिक), जयकुमार रावल (सिंदखेडा), हिकमत उढाण (घनसावंगी), मोनिका राजळे (पाथर्डी),सचिन कल्याणशेट्टी (अक्कलकोट),महेश लांडगे (भोसरी), शिवाजीराव कर्डिले (राहुरी).

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

14 तास ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

4 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

4 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

4 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

4 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

4 दिवस ago