मुंबई: शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या महायुतीला स्वराज्य संग्राम पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्वराज्य संग्राम पक्षाचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी घोषणा केली.
मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र हिताचे अनेक निर्णय घेतले. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला निधी उपलब्ध करुन दिला आणि मराठा समाजाच्या विकासाला चालना दिली. लाडकी बहिण योजना लागू करुन राज्यातील महिलांना न्याय दिला. त्यामुळे महायुतीला स्वराज्य संग्राम पक्ष जाहीर पाठिंबा देत आहे, असे तानाजीराव शिंदे म्हणाले.
शिवसेना महायुतीला सत्तेत आणण्यासाठी स्वराज्य संग्राम पक्ष महायुतीमध्ये सहभागी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी स्वराज्य संग्रामचे राज्यभरातील कार्यकर्ते शिवसेना महायुतीच्या विजयासाठी प्रयत्न करतील, असे आवाहन तानाजीराव शिंदे यांनी केले. मुंबई अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण पुन्हा मिळावे, अशी मागणी तानाजीराव शिंदे यांनी यावेळी केली.
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…